लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक एमआयडीसी स्थित महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार होत असल्याने, तसेच शे तकर्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या बाजार समितीत अनागोंदी कारभाराची चौकशी करावी व खासगी बाजाराचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे दीपक सुरडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन कृषी पणन राज्यमंत्नी सदाभाऊ खोत यांनासुद्धा देण्यात आले आहे. या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, महाराजा अग्रसेन खासगी बाजारात समितीमध्ये विक्रीसाठी येणार्या शे तमालाचा लिलाव केला जात नाही. परिणामी शेतकर्यांची फसवणूक होत आहे, तसेच या खासगी बाजार समितीच्या कागदपत्नामध्ये खाडाखोड करून क्षेत्न वाढवलेले आहे, तर खासगी बाजारासाठी आवश्यक असलेली जमीन पाच एकर नस तानादेखील खाडाखोड करून क्षेत्न वाढवलेले आहे. ही एक प्रकारे शासनाचीही फसवणूक करून लायसन्स मिळवले असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये केला आहे. तसेच बाजार समि तीमध्ये लिलाव होत नसल्याने व्यापारीही खरेदीसाठी येत नाहीत. या खासगी बाजार समितीचे मालक अग्रवाल यांनी परवाना घेताना हॉटेललाच शिदोरी गृह व लॉजला शेतकरी निवासस्थाने दर्शविले आहे. खरे पाहता त्या ठिकाणी त्यांचा हॉटेल, लॉजींग व लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय म्हणून वापर केला जात आहे. सर्वसाधारण शेतकर्यांना या हॉटेलमध्ये प्रवेशही करू दिल्या जात नाही, ही वस्तुस्थिती असून, शेतकर्यांचा शेतमाल खरेदी- विक्रीला प्राधान्य न देता कापसावर जिनिंग करून प्रक्रिया करण्याचा उद्योग चालविला जात आहे, तसेच खासगी बाजारात झालेल्या व्यवहाराचे बाजार भाव ऑनलाइन प्रसिद्ध केल्या जात नाही. यासह इतरही अनेक गंभीर आरोप या तक्रारीत केले असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी व खासगी बाजार समि तीचे लायसेन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे दी पक सुरडकर यांनी केली आहे. दरम्यान, संघटनेचे संस्थापक ना.सदाभाऊ खोत चिखली येथे आले असता, त्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रयत क्र ांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, विनायक सरनाईक, विलास तायडे, सचिन पडघान, भरत जोगदंडे, अनिल चौहान, अशोक सुरडकर, प्रवीण झगरे, पंकज लंबे, अमोल व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचा इशारा चिखली येथील खासगी बाजार समितीच्या अनागोंदीची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यासह लायसन रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिलेल्या तक्रारीद्वारे दिला आहे. रयत क्रांती संघटनेचे विनायक सरनाईक, दीपक सुरडकर आणि विलास तायडे यांच्या विरोधात नाफेड तूर खरेदीप्रकरणी शे तकर्यांची फसवणूक केल्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशनला आपण स्वत: केलेली आहे. त्याचा राग मनात धरून केवळ द्वेषभावनेतून आपल्या विरोधात खोटी तक्रार केलेली आहे. विशेष म्हणजे यांना राजाo्रय असल्याने माझ्या तक्रारीनंतरही चिखली पोलिसांकडून संथगतीने तपास सुरू आहे. -अशोक अग्रवाल संचालक, महाराजा अग्रसेन खासगी बाजार समिती चिखली