तालुक्यातील भोसा हे गाव अतिदुर्गम भागात
बसलेले असून हे आदिवासी बहुल गांव आहे. या गावातील नागरिकांना शुध्द व थंड
पाणी मिळावे, म्हणून भोसा
ग्रामपंचायत अंतर्गत चार
लक्ष रुपये खर्च करून पाणी
फिल्टर आरो बसविण्यात
आला. हे पाणी
फिल्टर फक्त चार दिवस
सुरू राहिले होते. या वॉटर प्लांट बंदप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री सातपुते यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
भोसा येथे गेल्या नऊ महिण्यांपासून पाणी फिल्टर आरो कायम बंद आहे. तो आजपर्यंत सुरू झालेला नाही. या बाबत लोकमतमध्ये
वृत्त प्रकाशित होताच जि.प.च्या मुख्य कार्यकारी
अधिकारी भाग्यश्री विसपुते
यांनी दखल घेऊन चौकशी
करण्याचे आदेश दिल्याचे दूरध्वनीवरून संपर्क केला
असता सांगितले. परंंतु
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व
ग्रामसेवक यांनी या बाबत कोणतीच कार्यवाही न केल्याने व ग्रामसेवक आर.जी. कृपाळ हे एक एक महिना भोसा गावात येत
नसल्याने पाणी फिल्टरसह भोसा गावाचा विकास पूर्ण खेाळबंला आहे. भोसा या गावातील नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे
मलेरिया, टाईफाईड यासारख्या
रोगांचा साथीचे रोगाची
लागण होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. आता
मुख्यकार्यकारी अधिकारी
भाग्यश्री विसपुते काय
कार्यवाही करतात याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे.