हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३0: शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्तक्षय होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा बालकांना रक्तक्षय होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने २ व ७ स प्टेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात १ ते १९ वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळून येतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा मुलांना कुपोषित करणारा असल्यामुळे राज्यात २ सप्टेंबर हा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळेतच जंतनाशक गोळ्या या दिवशी दिल्यानंतर किमान दोन तास या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याचे आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उ पस्थितीत आरोग्य विभागाने २७ ऑगस्ट रोजी घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्यामुळे जंताच्या गोळ्या वाटपाची मोहीम युद्धस्तरावर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी विद्यार्थी उपस्थित नसल्यास ७ सप्टेंबर रोजी पुन्हा जंतनाशक औषधाची मात्ना देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
आतड्यातील कृमीमुळे ५५ टक्के बालकांना रक्तक्षय!
By admin | Published: August 31, 2016 1:30 AM