लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘ब्रह्मपुरीच्या १00 वर्ष जुन्या शाळेची दुरवस्था’ असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारला जि.प.च्या सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता सुनील गावंडे यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी करून सदर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सन १९१८ मध्ये स्थापन झालेली ब्रह्मपुरी येथील जि.प. शाळा येत्या शैक्षणिक सत्रात शंभरी गाठणार आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सहा शिक्षक असून, १३४ विद्यार्थी एवढी पटसंख्या आहे. सदर शाळेची इमारत शिकस्त झालेली आहे. जागोजागी प्लास्टर उखडलेले आहे. इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. अशा इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण घेणे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या जीवित्वाला धोका निर्माण झाला आहे. या शाळेच्या इमारतीबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय धोंडगे, स्थानिक सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक कैलास दिवठाणे यांच्यासह नागरिकांनी सतत पाठपुरावा केला. याची दखल घेत आ.डॉ. रायमुलकर व जि.प. सदस्य आशीष रहाटे यांनी स्वत: पाहणी करून संबंधित विभागाला तत्काळ सूचना देऊन सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी सूचीत केले. तसेच यासंदर्भात ‘ब्रह्मपुरीच्या १00 वर्ष जुन्या शाळेची दुरवस्था’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते, या वृत्ताखी दखल घेत जि.प.च्या सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता सुनील गावंडे यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी करून मुख्याध्यापकांशी चर्चा केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गजानन म्हस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय धोंडगे, संजय म्हस्के, प्रमोद म्हस्के, मुख्याध्यापक कैलास दिवठाणे, सहायक अध्यापक अशोक ठाकरे, रामप्रसाद धांडे हजर होते.
ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:07 AM
ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘ब्रह्मपुरीच्या १00 वर्ष जुन्या शाळेची दुरवस्था’ असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारला जि.प.च्या सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता सुनील गावंडे यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी करून सदर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
ठळक मुद्देप्रभाव लोकमतचाशाळा होतेय शंभर वर्षांची विद्यार्थ्यांच्या जीवित्वाला धोका