दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर बनविण्याच्या दृष्टीने विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा शोध, तसेच शाळा स्तरावर तपासणी, तालुकास्तरीय तपासणी शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या मापानुसार सुलभपणे वर्गात बसता येईल. शालेय परिसर व दैनंदिन परिसरात कार्यकृती करता येईल, अशा साहित्य साधनांची व उपकरणांची आवश्यकता असणाऱ्या लाभार्थ्यांचे अस्थीव्यंग तज्ज्ञ, फिजीओथेरपिस्ट, प्रोस्थेटिक व आर्थिटिक इंजिनिअर व अलिम्कोच्या तज्ज्ञांमार्फत मोजमाप व तपासणी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार करण्यात आली. या शिबिरासाठी बुलडाणा ३४, चिखली ५८, देऊळगावराजा १३, तर सिंदखेडराजा तालुक्यातील १८, असे एकूण १२३ विद्यार्थी उपस्थित होते. जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथ) यांच्या आदेशान्वये सदर शिबिराचे नियोजन गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे व गट समन्वयक कु.वी.डी. उबरहंडे यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व केंद्र प्रमुख, विशेष तज्ज्ञ अनुराधा जाधव, वैशाली सुरडकर, सुष्मा पाटील, सीमा वानखेडे, आरती चव्हाण, अमोल पाटील, सचिन तायडे, सय्यद कलीग सय्यद बशीर, विशेष शिक्षक सविता बारोटे, संतोष खरात, श्रीनिवास बोडके, विजय सोनुने, संजय रिटे, उमेश इंगळे, सुरज गवई यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास डायट बुलडाणाचे प्रवीण वायाळ समुपदेशक तथा निमंत्रित सदस्य, शिक्षण व क्रीडा समिती जि. प. बुलडाणा समावेशित शिक्षण उपक्रमाचे जिल्हा समन्वयक सुनील ठाकरे, जितेंद्र क्षीरसागर, कल्पना बोरकर तसेच बुलडाणा, दे.राजा व सिं.राजा येथील विशेष तज्ज्ञ व विशेष शिक्षक उपस्थित होते.
साहित्य-साधने, उपकरणासाठी दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:41 AM