शाळेच्या पहिल्याच दिवशी जनूना केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश चव्हाण यांनी विश्वी येथील श्री विठ्ठल रखुमाई विद्यालय व प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेत कोविड नियमांचे पालन होते की नाही तसेच भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे की नाही व इतर सुविधा याबाबत तपासणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा विश्वी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा जनूना व जिल्हा परिषद शाळा राजगड येथेही भेट देऊन तेथील शाळेची तपासणी केली व जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे समूह करून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवून उजळणी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या अभ्यासक्रमाचा सराव करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:24 AM