पिंपळगाव सैलानी : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेला सुरूवात होत असून या यात्रा परिसराची जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सोमवारला यात्रा स्थळाची पाहणी केली. सैलानी बाबाच्या यात्रेत होळी व संदलसाठी लाखोच्या संख्येने भाविक येत असल्यामुळे या यात्रेतील रस्ते हे मोकळे ठेवण्यात येईल, जेणेकरून भाविकांची रस्त्यावर गर्दी होणार नाही. तसेच होळी परिसरात भाविकांवर व होळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उंच टॉवर उभारण्यात येईल तसेच सैलानी दर्गा ते जांभळीवाले दर्गा हा मुख्य रस्ता मोठा ठेवण्यात येणार आहे. सैलानी यात्रा परिसराची पाहणी करण्यासाठी बुलडाणा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपअधीक्षक संदिप डोईफोडे, पोलिस उपविभागीय अधिकारी बी.बी.महामुनी, जिल्हा वाहतूक अधिकारी सातपुते, रायपूर ठाणेदार जे.एन.सैय्यद, नायब तहसिलदार, विजय माळी, कैलास राऊत, पोलिस पाटील रामेश्वर गवते यावेळी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांकडून सैलानी यात्रा परिसराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:28 PM
पिंपळगाव सैलानी : जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सोमवारला यात्रा स्थळाची पाहणी केली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सोमवारला यात्रा स्थळाची पाहणी केली. सैलानी बाबाच्या यात्रेत होळी व संदलसाठी लाखोच्या संख्येने भाविक येत असल्यामुळे या यात्रेतील रस्ते हे मोकळे ठेवण्यात येईल, जेणेकरून भाविकांची रस्त्यावर गर्दी होणार नाही.होळी परिसरात भाविकांवर व होळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उंच टॉवर उभारण्यात येईल तसेच सैलानी दर्गा ते जांभळीवाले दर्गा हा मुख्य रस्ता मोठा ठेवण्यात येणार आहे.