कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस विभागाकडून चेकपोस्ट लावलेले आहे. धामणगाव ते पारध या रस्त्यावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. धाड पोलीस व पारध पोलीस प्रशासनाकडून सीमेवर वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. जालना जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या ई-पास ज्यांच्याकडे असेल त्यांनाच त्यांच्या जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. इतर वाहनधारकांना माघारी पाठविले जात आहे. तपासणी करताना ट्रिपलसीट, ई-पास, तोंडाला मास्क लावले आहे का? विनाकारण कुणी फिरत आहे का? आदी बाबींची चौकशी करून वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तेव्हाच परजिल्ह्यात एन्ट्री करावी, असे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे.
धामणगाव ते पारध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:35 AM