धामणगाव बढे : राज्यात जलक्रांती घडविणाºया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मोताळा तालुक्यातील पहिल्या १६ गावामध्ये राज्यस्तरीय पात्रता फेरीत सिंदखेड गावाने यापुर्वीच धडक दिली होती. या १६ गावामधून पहिल्या तीन विजेत्यांची निवड राज्यस्तरीय तपासणी पथकाव्दारे केली जाणार आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय तपासणी पथक २१ जुलै रोजी सिंदखेडमध्ये दाखल झाले. या तपासणी पथकामध्ये हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, हरिष डावरे, ज्ञानेश्वर मोहिते यांचा समावेश आहे. यावेळी समितीच्या वतीने श्रमदानातून तसेच मशिनच्या सहाय्याने स्पर्धा काळात झालेल्या विविध कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याने जलमय झालेले सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडींग, कंटुर बांध, माती नाला बांध याची समितीने पाहणी केली. तसेच गावातील वृक्ष लागवड, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, शाळा, पाणीपुरवठा यंत्रणा, ग्रामपंचायतची पाहणी करून पोपटराव पवार यांनी सरपंच विमल कदम तथा गावकºयांचे कौतूक केले. राज्यस्तरीय समितीव्दारा निवड झालेल्या १६ गावांची तपासणी होत असून सिंदखेड हे त्यापैकी दहावे गाव होते. १२ आॅगस्ट रोजी बालेवाडी पुणे येथे भव्य कार्यक्रमात राज्यस्तरीय तसेच विविध विजेत्यांची घोषणा एका भव्य कार्यक्रमात होणार आहे. यावेळी सिंदखेड येथे झालेल्या ग्रामसभेत पोपटराव पवार यांनी गावकºयांना मार्गदर्शन केले. तर पाणी या विषयावर सर्व मतभेद दूर करून सर्व पक्ष एकत्र आले हे पाणी फाऊंडेशनचे यश असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी पानी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाने, लोकप्रतिनिधी आ.हर्षवर्धन सपकाळ, सुमित गोरले, पाणी फाऊंडेशन मोताळा तालुका समन्वयक सतिष राठोड, बिंदीया तेलगोटे, मंगेश लोढम उपस्थित होते. तर ग्रामसभेला पाचशेपेक्षा अधिक गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यस्तरीय समितीकडून सिंदखेड येथील कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:10 PM
पाण्याने जलमय झालेले सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडींग, कंटुर बांध, माती नाला बांध याची समितीने पाहणी केली.
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय तपासणी पथक २१ जुलै रोजी सिंदखेडमध्ये दाखल झाले. समितीच्या वतीने श्रमदानातून तसेच मशिनच्या सहाय्याने स्पर्धा काळात झालेल्या विविध कामाची पाहणी करण्यात आली. सिंदखेड येथे झालेल्या ग्रामसभेत पोपटराव पवार यांनी गावकºयांना मार्गदर्शन केले.