- अनिल उंबरकार शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने पार पडला.शहरातील श्रीमंत तसेच अध्यात्माचा वारसा चालविते असलेले कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील गुरूवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर,शंकर महाराज जागृती आश्रम शेलोडी, शंकरबाबा पापळकर वझ्झर जि अमरावती,श्री गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष नारायणराव पाटील,आचार्य हरीभाऊ वेरूळकर, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह भ प प्रकाशबुवा जवंजाळ प्रकाश पोहरे, खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर,आ. आकाश फुंडकर , माजी आमदार नाना कोकरे, जि पो अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, तहसीलदार शिल्पा बोबडे यांचेसह आप्तेष्ट व शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती.
विठ्ठल मुर्ती ठरली आकर्षण....लग्न मंडळाचे प्रवेशद्वाराजवळील विठ्ठलाची मुर्ती तसेच वर वधू चे स्टेजवर श्री गजानन महाराज चा फोटो सर्वांचे आकर्षण ठरलेत. लग्न मंडपात प्रवेश करतेवेळी प्रत्येक जण विठ्ठल दर्शन घेवून पुढे जात होता. येथेही जणू पंढरीत आलो की काय असे प्रत्येकाला जाणवत होते.
भाऊंचे अभिवादन....मंगलाष्टके झाल्यावर सुलग्न लागले. प्रथम आजोबा म्हणून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व आजी सौ उमादेवी पाटील यांनी वधू-विरांना आशिर्वाद दिला. व स्टेजवरून शिवशंकरभाऊ पाटील यांना वराडी व पाहुणे मंडळाला हात जोडून अभिवादन केले.
प्रेरणादायी सोहळा...संतांचा वारसा जपणारा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व कुटूंबियांनी मराठमोळ्या व साध्या पध्दतीने चि. हरिहर यांचा विवाह पार पाडला. कुठलाही बडेजाव न करता एखाद्या सामान्य नागरिकांचे कुटुंबातील लग्नाप्रमाणे विवाह सोहळा पार पाडून शेगावच्या पाटील घराण्याने आदर्श निर्माण केला असून इतरांना हा विवाह सोहळा प्रेरणा देणारा ठरला आहे.- शंकरबाबा पापळकरवझ्झर आश्रम जि अमरावती