लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्यावतीने जळगाव खान्देश येथे अयोजित करण्यात आलेल्या आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत बुलडाण्याचा उपात्यंफेरीत तगड्या कोल्हापूर संघाने सहा विरुद्ध शुन्य अशा गोल फरकाने पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे बुलडाण्याचे स्वप्न भंगले आहे.ठाणे जिल्ह्याचा ४-३ अशा गोलफरकाने शनिवारी पराभव करत बुलडाणा संघाने उपात्य सामन्यात धडक दिली होती. मात्र कोल्हापूर संघासोबत खेळताना बुलडाणा संघास लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रारंभापासूनच बुलडाणा संघावर दबाव निर्माण केला होता. प्रतीक्षा मिठारी, मृणाल खोत, ज्योती ढेरे यांच्या आक्रमक चालीसमोर बुलडाण्याचा महिला संघ काहीसा कमकुवत वाटत होता. पहिल्या हॉफमध्येच कोल्हापूर संघाने सलग दोन गोल करत बुलडाणा संघावर दबाव वाढवला होता. दरम्यान दुसऱ्या हापमध्ये आपली आक्रमकता वाढत तब्बल चार गोल कोल्हापूर संघाने करत या स्पर्धेच्या विजेतपदावरच आता दावा ठोकला आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्यातून २० फेब्रुवारी पासून जळगाव खान्देश येथे या स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत बुलडाणा संघाने पहिल्या सामन्यापासूनच आक्रमकता आणि संरक्षण दोन्ही पातळ््यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धा; कोल्हापूरची बुलडाण्यावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:42 PM