लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शासकीय,जि. प., न. प. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पर्यवेक्षण यंत्रणेतील अधिकारी यांच्यासाठी सुरू असलेल्या निष्ठा प्रशिक्षणार्थ्यांशी आज बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस . षण्मुगराजन यांनी गुरूवारी झूम मिटिंगद्वारे संवाद साधला. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र विकासासाठी राष्ट्रीय पुढाकार अर्थात 'निष्ठा' हे प्रशिक्षण बुलडाणा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ३० डिसेंबर २०१९ पासून जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सुरू झाले होते .त्यापैकी सध्या बुलढाणा ,चिखली, मेहकर, मलकापूर व खामगाव याठिकाणी निष्ठा प्रशिक्षणाची पाचवी बॅच सुरू आहे. या बॅचमध्ये सहभागी निष्ठा प्रशिक्षणार्थ्यांसोबत गुरूवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस . षण्मुगराजन यांनी झुम मीटिंग द्वारे संवाद साधून प्रशिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच प्रत्येक केंद्रावरील प्रशिक्षणार्थी शिक्षकांसोबत संवाद साधून प्रशिक्षणामध्ये असलेल्या नावीन्यपूर्ण बाबींविषयी जाणून घेतले . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हाभरातील 'निष्ठा ' प्रशिक्षणार्थी यांचेसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा झूम मीटिंगद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचही प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक यांच्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवाद साधून निष्ठा प्रशिक्षणाची माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत बुलडाणा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रवी जाधव, आयसीटी विषय सहाय्यक संतोष तेजनकर, गणित विषय सहाय्यक गजानन पवार यांची उपस्थिती होती. प्रशिक्षण केंद्र समन्वयक म्हणून सुजाता भालेराव बुलडाणा, राजेंद्र अजगर मेहकर, सचिन तांबेकर मलकापूर, विकास लोखंडे चिखली, अरविंद शिंगाडे खामगाव यांनी आपापल्या 'निष्ठा' प्रशिक्षण केंद्रांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. प्रशिक्षणाच्या एकंदरीत कार्यवाही बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुगराजन यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कौतुक केले. तसेच निष्ठा प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले .
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झूम मिटींगद्वारे साधला 'निष्ठा' प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:18 PM