७ मार्चला रात्री १० वाजता या आंतराष्ट्रीय अनुबंधचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने पार पडणार आहे. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सद्याच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. विदेशात कार्यरत सुमारे ३०० माजी विद्यार्थ्यांसह देशभरात विविध भागात कार्यरत माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रामुख्याने शांतीलाल बावेल, गौरांग शहा, प्रभाकर सिंग, नीरव पटेल, जलपानकुमार पटेल, योगेश खंडाळ, हे माजी विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन बोंद्रे आदी मान्यवर या मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार असून महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत माजी विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधणार, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांनी दिली आहे.
अनुराधा अभियांत्रिकीव्दारे आंतराष्टीय 'अनुबंध'चे आयोजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:07 AM