मेहकर : येथील पोलीस स्थानकाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी काम करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे स्वप्नील गव्हणे यांनी पोलीस स्थानकाला इर्न्व्हटर भेट दिला आहे.
शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, शहरातील पोलीस कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी हे कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून रात्रं-दिवस काम करत आहेत. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या वेळी पोलीस स्थानकामध्ये पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस स्थानकामधील वीजपुरवठा खंडित झाल्यास कामात अडथळे निर्माण होतात. देऊळगाव माळी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव व ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गव्हणे यांनी पोलीस स्थानकाला त्यामुळे इर्न्व्हटर भेट दिला. यावेळी ठाणेदार युवराज रबडे, पोलीस कर्मचारी लोंढे, निळे, रिंडे, इब्राहिम परसूवाले, पवार, आदी उपस्थित होते.