लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी होणार्या आदिवासी मराठी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी सातपुड्यातील भिलाला व बारेला आदिवासी जमातीच्या संस्कृतीवर संशोधन केले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी वहारू सोनावणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक तुमराम राहतील. आदिवासी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, निबंध वाचन या दोन दिवसीय चर्चासत्रात होणार आहे. कविसंमेलानचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांना मिळाला आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय चर्चासत्रासाठी गोविंद गायकी आमंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:38 AM
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी होणार्या आदिवासी मराठी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी सातपुड्यातील भिलाला व बारेला आदिवासी जमातीच्या संस्कृतीवर संशोधन केले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी वहारू सोनावणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक ...
ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी होणार्या आदिवासी मराठी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आमंत्रितत्यांनी सातपुड्यातील भिलाला व बारेला आदिवासी जमातीच्या संस्कृतीवर संशोधन केले आहे