- अनिल गवई
खामगाव - भारताच्या इतिहासात मानाचा तुरा खोवणारे चांद्रयान० ३ शक्रवार(१४ जुलै) रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरी कोटा येथून लॉन्च केल्या जाणार आहे. इसरोच नाही तर देशासह जगाच्या नजरा या लॉन्चिंगवर लागून आहेत. त्याचवेळी थर्मल शिल्ड प्रोडक्टमुळे चांद्रयानाला खामगावचा स्पर्श लाभला आहे. ही बाब संपूर्ण खामगावकरांसाठी भूषणावह मानल्या जात असल्याने चांद्रयानाबाबत कमालिची उत्स्कुता खामगावात दिसून येत आहे.
खामगाव येथील विकमशी फॅब्रिक्स प्रा.लि. ने निर्माण केलेल्या थर्मल शिल्ड प्रोडक्टचा चांद्रयान ०३ मध्ये वापर करण्यात आला आहे. मिग २१ फायटर प्लेनसाठी लागणारी ताडपत्री तयार करून खामगावने भारतीय संरक्षण विभागात सवार्त आधी आपले योगदान दिले. १९८७ साली मिग विमानासाठी ताडपत्रीचे उत्पादन करून तर १९९० मध्ये सर्जीकल आणि रबरशीटच्या उत्पादनाच्या माध्यमातून विकमशी उद्योग समूहाने आपला ठसा उमटविला होता. त्याचवेळी अग्नीबाणाच्या उष्णतेपासून उपग्रह सुरक्षीत ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या पातळ फॅब्रिकचीही निर्मिती यापूर्वी खामगावात झाली आहे. जीएसएलव्ही मार्क ०३ अग्नीबाणाच्या साहा्याने ३.१३ टन वजनाच्या जी सॅट १९ उपग्रहासाठी पातळ फॅब्रिक तयार करण्यात आले हाेते. हे येथे विशेष.
तिन्ही चांद्रयानात खामगावच्या उत्पादनाचा वापरभारतीय संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या विविध उत्पादनाच्या पुरवठ्याच्या माध्यमातून इस्त्रोच्या कामगिरीत खामगावचा खारीचा वाटा राहीला. आता चांद्रयान ३ मध्ये थर्मल शिल्ड प्रोडक्टचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी चांद्रयान ०२ आणि ०१ मध्ये देखील खामगाव येथील थर्मल शिल्डचा वापर करण्यात आला होता.
चांद्रयान ३ मध्ये खामगाव येथील थर्मल शिल्ड प्रोडक्टचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी दोन्ही चांद्रयानात खामगाव येथील थर्मल शिल्डचाच वापर करण्यात आला होता. ही आमच्यासाठी भूषणावह बाब असून, देश रक्षणासाठी योगदानाचे समाधान आहे.-गितिका विकमशी(संचालिका, विकमशी फॅब्रिक्स, खामगाव)