लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल्याची माहिती असून, त्यांच्या प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील कचरा व्यवस्थापनात पालिका प्रशासनाच्यावतीने महिन्याकाठी लाखो रूपयांची देयके अदा केली जात आहे. सदर ट्रॅक्टरच्या ट्रिप कमी होवूनही रेकॉर्डवर जादा दाखवून लाखो रूपयांची बिले काढण्यात येत असून मलकापुरातील शिवसेनेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती मिना संचेती, राधिका किशोर नवले, ज्योती राजु कुलोकर यांनी आक्रमक पवित्रा घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. मंगळवारी सकाळीच महिला बालकल्याण सभापती मिना ललवाणी ह्या जातीने रस्त्यावर उतरल्या त्यांनी बिर्ला रोड, रामदेवबाबा नगर या परिसरात कचºयाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टरची झाडाझडती घेतली. त्यांच्याजवळील कागदपत्रे त्यांनी तपासली असता लायसन्स, आरसी बुक, शेरेबुक अनेकांजवळ आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आरोग्य सभापती अॅड.जावेद कुरेशी यांना तात्काळ बोलावून हा प्रकार त्यांना अवगत करून दिला.दरम्यान शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून कचºयाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून शिवसेना महिला नगरसेविका आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:23 PM
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल्याची माहिती असून, त्यांच्या प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती ...
ठळक मुद्देमहिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली.मिना संचेती, राधिका किशोर नवले, ज्योती राजु कुलोकर यांनी आक्रमक पवित्रा घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.