चिखली(जि. बुलडाणा) : शेतकर्यांच्या प्रश्नावर लढत असताना मी कधीही ङ्म्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ङ्म्रेयापेक्षा शेतकर्यांचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी गोद्री येथील शेतकरी सभेत केले. तालुक्यातील गोद्री येथे ११ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ना.रविकांत तुपकर यांच्या हस्ते संघटनेच्या शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन शाखाध्यक्षपदी प्रमोद मुळे, उपाध्यक्षपदी विलमसिंग सोळंकी तर सचिवपदी सुधाकर सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या थकीत कर्जबुडव्या संचालकांचा सुद्धा तुपकरांनी समाचार घेत शेतकर्यांची जिल्हा बँक बुडविणार्या संचालकांना तुरुंगात डांबल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. सभेला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेतक-यांचे प्रश्न सुटणे महत्वाचे — ना. तुपकर
By admin | Published: April 15, 2016 2:15 AM