- नविन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पाण्याचा डॉक्टर म्हणून ज्यांची जनसामान्यांत ओळख आहे. सुमारे २० वर्षापासून ज्यांनी ग्रामस्वच्छता व जलसंधारणाच्या कार्यासाठी वाहून घेतले, असे डॉ. अविनाश पोळ. अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनचे विश्वस्त, राष्टÑपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त डॉ.अविनाश पोळ हे पानी फाऊंडेशनच्या कामानिमित्त मोताळा तालुक्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांचेशी संवाद साधला असता, लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील चार वर्षाचा पानी फाऊंडेशनचा प्रवास या टप्प्यावर त्याच्या यश-अपयशाकडे कसे बघता?समाधानी आहे. दरम्यान, लोक एकत्र आले. लोकसहभागातून प्रचंड कामे झाली. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्याने आयुष्यात प्रथमच रब्बीचे पिक घेतल्याचे सांगितले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन गहु बघितला हेच या संघर्षाचे मोठे फलीत आहे.
समृध्द गाव स्पर्धेचा उद्देश काय?वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो गावांनी आपआपल्या गावामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढविली. परंतु यापैकी अनेक गावात पाण्याची उपलब्धता वाढल्याने जास्तीत जास्त पाणी लागणाºया पिकाचे क्षेत्र काढले. त्यामुळे सामुहिक जलव्यवस्थापन या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
समृध्द गाव स्पर्धेसाठी प्रामुख्याने कोणती कामे अपेक्षित आहेत?मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्ष व जंगलाची लागवड व वाढ करणे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे व स्वयंरोजगार निर्मिती यातून समृध्द गावाची निर्मिती व शाश्वत विकास होण्यास मदत होईल. यादृष्टीने वाटचाल महत्त्वाची आहे.
पाणी फाऊंडेशनच्या कामात लोकसहभाग किती महत्वाचा?लोकसहभागाच्या माध्यमातून सामुहीक लोकचळवळ निर्माण करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हेच पाणी फाऊंडेशनच्या कामाचे सुत्र आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग समृध्द गावासाठी महत्वाचा आहे. एखाद्या चळवळीत लोकांना सामावून घेणे, लोकांना बदलने हे निश्चितच सोपे नाही; परंतु लोक बदलतात, याचा अनुभव या मोहिमेदरम्यान चांगलाच आला. गरज असते त्यांना विश्वासात घेण्याची समाधानाची. या कार्यक्रमामध्ये युवक स्वत: पुढे येत आहे. मानसिकता बदलली की प्रश्न अनुत्तरीत राहतच नाही.