स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोना उपचाराबरोबरच लसीकरणाबाबतही शासनाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत. लसीकरणाबाबत पसरविण्यात येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीमध्ये लस घेतली तरी कुठलाही अपाय होत नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीवर विसंबून न राहता महिलांनी लस घ्यायला हवी. गरोदर आणि बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये.
डॉ. प्रमिला सोळंके, स्त्रीरोगतज्ज्ञ, बुलडाणा.
आतापर्यंत झालेले लसीकरण...
पहिला डोस घेणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचारी महिलांची संख्या : ९२६४
दुसरा डोस घेणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचारी महिलांची संख्या : ४४३३
पहिला डोस घेणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स महिलांची संख्या : ५२९१
दुसरा डोस घेणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स महिलांची संख्या : १२९९
पहिला डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील महिलांची संख्या : ९८२६८
दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील महिलांची संख्या : १२६८९