- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आजच्या काळातील काही अप्रिय घटनांमुळे सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे भारतातील बुध्दीजीवी चिंतेत आहे. मात्र, आपसी मतभेद मिटवून समाजात एकात्मतेची ज्योत पेटविण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. जाती, पंथ आणि मतभेद मिटविण्यासाठी भावी युवापिठी सक्षम आहे, असा आपला ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेच्या कायार्ला सुरूवात कशी झाली?उत्तर - आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील काही निवेदकांची हुबेहुब नकल करून कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करायचो. मात्र, काही वडीलधाऱ्यांनी सल्ला दिला की निवेदन करताना दुसºयाची नकल करण्याऐवजी स्वत:ची शैली निर्माण करा. सुरूवातीला वाईट वाटले पण.. वडील धाऱ्यांचा हाच गुरूमंत्र मला कालातंराने सामाजिक एकतेकडे घेऊन गेला.
प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व पटविण्यासाठी कोठे-कोठे गेलात?उत्तर - विविध सामाजिक कार्यक्रमांचे निवेदन, सुत्रसंचालन करताना अनेक ठिकाणी जाण्याचे योग आले. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘दूत’ म्हणून दिल्ली, भोपाळ, आग्रा, तेलंगाणा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २००० कार्यक्रमातून सामाजिक एकता, अंहिसा आणि सर्व धर्म समभावाबाबत प्रबोधन केले.
प्रश्न - आपल्या लेखी आपण कोणाला मोठं मानता?उत्तर - जगात अनेक मोठ-मोठी लोकं होऊन गेलीत. मोठं-मोठे राजे होऊन गेलेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक पराक्रम त्यांनी गाजविले. मात्र, समाजात सामाजिक समतेचा मुलमंत्र देणारे महापुरूष हेच मोठे होत. त्याचप्रमाणे प्रेमाची शिकवण देणारा प्रत्येक माणूस आपणाला प्रिय आहे. ह्यकोई सलाम करे..कोई नमस्कार करे लेकीन बडा वही है. जो इन्सान से प्यार करे!प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले योगदान काय?उत्तर - विविध जाती-धर्मांच्या महापुरूषांनी एकात्मतेची शिकवण दिली आहे. मनुष्याचे रक्त एकसारखे असल्याने निमार्ता मनुष्यामध्ये कोणताही भेद करीत नाही. माज्या लेखी देखील जाती आणि वर्णभेदाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गत ४० वर्षांपासून आपला पुढाकार राहीला आहे. या कालावधीत देशात दोन हजाराच्यावर सर्वधर्म समभावाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केले. त्यामुळे राष्ट्रीय कौमी एकतेचा ह्यदूतह्ण आपली शासनाने नियुक्ती केली आहे.