बुलडाणा: अलिकडील काळात राजकारणाची व्याख्या बदलत असून तत्व पाळल्या जात नसल्याची खंत शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. बुलडाणा येथे औपचारिक भेटीवर ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. दरम्यान, भाजपशी त्यावेळी जुळवून घेणे अत्यंत अवघड झाले होते. सत्तेत सोबत असतानाही भाजपी स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.सातत्याने भाजपकडून दिला जाणारा दुजाभाव पाहता अखरे शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यावी लागली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीएएला शिवसेनेचा विरोध नाही पण एनआरसीमध्ये नंतर टाकण्यात आलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत. त्याबाबात भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे ते म्हणाले.अमरावतीच्या राजकारणात सक्रीयच असून तेथे आपला फोकस कायम आहे. निश्चलीकरणामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या. सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच अडचणी आल्या व अर्थचक्राला फटका बसला, अद्याप त्यातून आपण वर आलो नाही, असे सांगत बेरोजगारी वाढली आहे. उद्योग बंद पडले आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असले तरी जिडीपी साडेचार ते पाच टक्क्यावर जात नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेते सर्व आलबेलबुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याबाबत त्यांना छेडले असता प्रथमत: या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेची पूर्वीचीच ताकद कायम आहे. दोन आमदार, एक खासदार येथे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत असे वाद नाही, असेच त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्यात आपण प्रदीर्घ काळ खासदार होता. बुलडाण्यात मिळालेले प्रेम आणि येथील सांस्कृतिक वारसा हा माणुसकीचा आहे. आज अन्यत्र परिवर्तन होत असले तरी बुलडाणेकरांनी आपल्यातील माणुसकी टिकवून ठेवली असल्याचे ते म्हणाले.
...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:37 PM