हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २३-ह्यलेक वाचवाह्णच्या पुढे एक पाऊल टाकून राज्याच्या शिक्षण विभागाकडून आता ह्यलेक शिकवाह्ण अभियान राबवण्यात येत असून, जिल्ह्यातील एकूण २ हजार ३३२ शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचा माध्यमातून लेक शिकवाचा जागर करण्यात येत आहे.या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३ जानेवारीपासून करण्यात आली असून, २३ जानेवारीपर्यंंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्यलेक शिकवाह्णबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये मुली शिक्षणाकडे वळाव्यात, मुलींना शिकवण्याची मानसिकता वाढीस लागावी, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळेत सातत्याने अनुपस्थित असलेल्या मुलींच्या घरी शालेय समितीचे सदस्य भेट देत आहेत. त्याचप्रमाणे शाळेत न जाणार्या मुलींना शाळेत पाठवावे, यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रम घेत आहेत.या कालावधीमध्ये गावातील शिक्षिकांचा, महिला कार्यकर्त्यांचा, महिला पालकांचा, एकच मुलगी असलेल्या पालकांचा, विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येत आहे. काही गावात आदर्श माता पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये मुलींची आरोग्य तपासणी, ज्युडो-कराटेंचे प्रात्यक्षिक, संगणक साक्षरता वर्ग, वक्तृत्व, निबंध, मैदानी खेळांच्या स्पर्धा, माता-पालक-शिक्षक संवाद सभा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रभावी अंमलबजावणीलेक शिकवा अभियानासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेताना असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग परिश्रम घेत आहेत. लेक वाचवाप्रमाणे लेक शिकवा अभियानाला ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जनजागृती करीत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात ‘लेक शिकवा’ अभियानाचा जागर!
By admin | Published: January 24, 2017 2:20 AM