लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिकांच्या उत्पादनावरसुद्धा याचा परिणाम जाणवत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणार्या पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य जनतेसह शेतकर्यांना याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना, पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळ उपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकर्यांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जेसीबी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हय़ातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादिया, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जयचंद बाठिया यानी केले, तर आभार नीलेश नाहाटा यांनी केले.
‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:44 AM
मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे३ मार्चपासून राबविणार उपक्रम दुष्काळावर मात करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी