शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

चिखलीत मराठा समाजातील आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 7:04 PM

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले.

बुलडाणा -  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतले.सकल मराठा समाजाच्यावतीने चिखलीत २४ जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत आरक्षणासाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा संकल्प करून सकल मराठा समाजाच्यावतीने शहराला लगूनच असलेल्या वायझडी धरणामध्ये पाण्यात उतरून मराठा समाजबांधवांच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले याआंदोलनाची बातमी सर्वत्र पसरताच आंदोलनस्थळी पोलीसांनी धाव घेतली.दरम्यान ठाणेदार महेंद्र देशमुख, नायब तहसिलदार झाल्टे यांच्या उपस्थित आंदोलनकर्ते प्रशांत ढोरे  पाटिल, दत्ता सुसर, बंडु नेमाने, संजय कदम, निलेश लोखंडे, भगवान देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कार्यकरत्यांनी प्रचंड  घोषणा बाजी करून परीसर दणाणून सोडला होता. यावेळी कपील खेडेकर, विनायक सरनाईक, बंटी लोखंडे, शरद चिंचोले, अनिल गोराडे, बिट्टु देशमुख, संतोष देशमुख, पवण म्हस्के, बंडु नेमाने, शैलेश अंभोरे, दिपक सुरडकर, शैलेश डोणगावकर, शुभम खेडेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान धरणात उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कलम  १०७ नुसार कारवाई करून अटक केली व जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnewsबातम्या