बुलडाणा : राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय, प्रगतीविषयक, विकासात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमत्वांचा सह्याद्री उद्योग समूह ‘सह्याद्री पुरस्कार देवून’ गौरव करते. बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृउबा सभापती जालिंदर बुधवत यांनाही सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सह्याद्री सहकाररत्न पुरस्काराने मान्यवरांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथे माऊली सभागृहात २९ जून रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे, सह्याद्री उद्योग समूहाचे संदीप थोरात, माजीमंत्री बबनराव पाचपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील सहकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अर्थकारण, विधी या क्षेत्रातील दिग्गजांना पूरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ना.जानकार यांनी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बुधवत यांनी बुलडाणा कृउबासच्या विकासात्मक बदलाची माहिती दिली. यावेळी माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव, राजु मुळे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, समाधान बुधवत, कृष्णा बुधवत, गिरीश गाडेकर यांची उपस्थित होती.