जळगाव जामोद: स्थानिक दुर्गा चौकांमध्ये असलेल्या नवीन कॉम्प्लेक्सच्या हर्राशी प्रकरणाची गुपचूप निविदा काढून मजीर्तील लोकांना विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकार्यांच्या कक्षामध्ये गदारोळ केला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली.जळगाव नगरपरिषदेने दुर्गा चौकामध्ये भव्य असे व्यापारी संकुल बांधलेले आहे. सदर संकुलामध्ये अंदाजे २८ दुकाने आहेत. शहराच्या मध्यभागी असलेले हे कॉम्प्लेक्स आणि या मधील दुकाने घेण्यास गेल्या कित्येक दिवसापासून शहरवासी उत्सुक आहेत. परंतु अद्यापही त्याची हर्र्राशी झालेली नाही. गुरूवारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन वाघ, अर्जुन घोलप, रमेश ताडे, संदीप मानकर, नितीन ढगे ,श्रीकृष्ण केदार, कलीम भाई यांच्यासह संजय भुजबळ, संतोष बोरसे, जहीर भाई यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला. तेव्हा सदर कॉम्प्लेक्सची छोटीसी निविदा काढून त्यासाठी मजीर्तील चार ते पाच लोकांनी निविदा भरल्या होत्या. परंतु सदर बाब विरोधकांच्या लक्षात आली. त्यामुळे मुख्याधिकारी कक्षात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विचारणा केली. यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे गजानन वाघ आणी रमेश ताडे यांनी पेट्रोल अंगावर घेतले होते. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मुख्याधिकारी अशिष बोबडे यांनी विरोधी नगरसेवकांना लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर सदर लिलावाला मुदतवाढ देण्याबाबतचे पत्र दिल्याने वातावरण शांत झाले.
जळगाव जामोद : मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात दोन शिवसेना नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 7:11 PM
Jangaon Jamod Shiv Sena Corporators गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली.
ठळक मुद्देपोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकार्यांच्या कक्षामध्ये गदारोळ केला.