- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांनी विजयी चौकार मारला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव केला.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात सर्वात कमी उमेदवार रिंगणात असलेला हा मतदासंघ होता. चार उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर व भाजपाचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांच्यातच होती. मतदानानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये ‘काट्याची लढत’ होईल, असे चित्र मतदारसंघात होते, परंतु निकालाच्या दिवशी सर्वांनाच हादरे बसले. मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रत्येक फेरीत डॉ. संजय कुटे यांना लीड मिळाला आणि हीच बाब त्यांना ३५ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवून गेली. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत या मतदारसंघात विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांचाही परिणाम निकालावर झालेला दिसून आला. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी डॉ. संजय कुटे यांना १ लाख २ हजार ७३५ मते मिळाली. दुसºया दुसºया क्रमांकाची ६७ हजार ४९४ मते काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संगितराव भोंगळ यांना तिसºया क्रमांकाची २९ हजार ९७५ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रमेश नवथळे यांच्या पारड्यात केवळ १२८१ मते पडली. सर्व मतदारांना मिळालेली मते पाहता पराभूत उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही जास्त मते भाजपचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय एकतर्फी म्हटल्यास वावगे ठरू नये. मतदारसंघातील २२३२ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबने पसंत केले. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीनंतरचे चित्र बघता, डॉ. संजय कुटे यांनी एकतर्फी विजय संपादन केला. एकाच पक्षातून तब्बल ४ वेळा आमदार होण्याचा एक विक्रम त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघात प्रस्थापित केला. डॉ. संजय कुटे यांना विजयी घोषित केल्यानंतर जळगाव शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
जळगाव जामोद निवडणूक निकाल : डॉ. संजय कुटेंचा विजयी चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:35 PM