शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

जळगाव जामोद तालुका : थकबाकीने जीवन प्राधिकरण घायाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 2:03 AM

जळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थकबाकी ही चक्क ९ कोटी ३६ लाख ३७ हजार ३५६ वर जाऊन पोहचली असून, या आर्थिक वर्षात पाणीपट्टीची वसुली फक्त १८ लाख असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अक्षरश: घायाळ झाला आहे.

ठळक मुद्देनळधारकांकडे ९ कोटी ३६ लाखांची थकबाकी, वसुली फक्त १८ लाख

नानासाहेब कांडलकर। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थकबाकी ही चक्क ९ कोटी ३६ लाख ३७ हजार ३५६ वर जाऊन पोहचली असून, या आर्थिक वर्षात पाणीपट्टीची वसुली फक्त १८ लाख असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अक्षरश: घायाळ झाला आहे. थकीत नळधारकांना नवीन पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होणार असून, थकीत बिलाची रक्कम भरण्याचा आर्त टाहो जीवन प्राधिकरण विभाग करीत आहे.जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत १९७१ मध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्यावेळी जळगावकरांना चोवीस तास पाणी पुरवठा केल्या जात आहे. ही स्थिती १९८६ पर्यंत कायम होती, त्यानंतर मात्र सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा केला जात असे. नळधारकांची वाढत गेलेली संख्या व पाण्याचे कमी होत गेलेले स्रोत यामुळे १९९५ पासून नगरात पाणी टंचाईला सुरुवात झाली. या योजनेची मुदतसुद्धा २००१ ला संपली. त्यामुळे जीवन प्राधिकरण विभागाकडून या योजनेवर कोणताही खर्च करणे बंद झाले. पुढे पुढे पाण्याचे स्रोत अत्यंत कमी झाल्याने व पाइपलाइनचे चोकअप वाढल्याने नगराच्या काही भागात पाणी मिळणेच दुरापास्त झाले. इतर नळधारकांनाही पाणी मिळण्यासाठी नळाला मोटार लावणे गरजेचे झाले. या सर्वांचा परिणाम असा झाला, की बहुतांश नळधारकांनी पाणी बिल भरणेच बंद करून टाकले. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. दोन वेळा थकीत बिलावरही व्याज माफीची घोषणाही करण्यात आली. फक्त पूर्ण मुद्दलाची रक्कम भरणे गरजेचे होते. त्याचा फार कमी पाणी ग्राहकांनी फायदा घेऊन नळ बिल ‘निल’ केले. सध्या नगरात २२४३ नळधारक आहेत. त्यातील सुमारे १५०० पेक्षा जास्त नळधारक थकीत आहेत. थकीत बिलामुळे मुद्देलापेक्षाही व्याजाची रक्कम जास्त झाली आहे. नळधारकांकडे ३ कोटी ९४ लाख ५१ हजार २४६ एवढी मूळ थकबाकी आहे; परंतु अनेक वर्षे पाणी बिल न भरल्याने या थकबाकीच्या व्याजाची रक्कम चक्क ४ कोटी ६३ लाख ९७ हजार ८५६ एवढी झाली आहे. मुद्दल अधिक व्याज मिळून नळधारकांची थकबाकी ८ कोटी ५८ लाख ३९ हजार ०६२ एवढी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाला व्याजाच्या माफीचा आदेश काढण्याची गरज आहे.

नगर परिषदही थकबाकीच्या भोवºयातनगर परिषदेचे सध्या नगरात फक्त तीन स्टॅण्ड पोस्ट (सार्वजनिक नळ) आहेत; परंतु मागील २० वर्षांत ही संख्या खूप जास्त होती. त्यामुळे नगर परिषदेची पाणी बिलाची थकबाकी लाखोंच्या घरात गेली आहे. सध्या नगर परिषदेकडे ७७ लाख ८८ हजार २९४ एवढी पाणी बिलाची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त २३ लाख ७५ हजार ७२७ एवढे मुद्दल असून, ५४ लाख १२ हजार ५६७ म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त व्याज आहे. या सर्व थकबाकीच्या चक्रव्यूहात मार्ग कसा काढावा, हा प्रश्न सध्या जीवन प्राधिकरण विभागाला भेडसावतो आहे.

नवीन नळ कनेक्शनच्या वेळी थकितांची अडचणजळगाव नगरात वान धरणावरील पाणी पुरवठ्याची नवीन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. नवीन टाकींची उभारणी व नवीन पाइपलाइन आदींचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पाइपलाइनवरून नळ कनेक्शन दिल्या जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पाइपलाइनवरून नळ कनेक्शन दिल्या जाईल. त्यावेळी जे थकीत ग्राहक आहेत, त्यांना कनेक्शन मिळणार की नाही, हा प्रश्न उभा ठाकणार आहे. आ.डॉ. संजय कुटे यांची भूमिका ही पाणी बिल भरलेच पाहिजे, अशी आहे. त्यामुळे काही महिन्यांनंतर नगरात नळ कनेक्शनवरून मोठा हल्लकल्लोळ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदWaterपाणी