लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रविवारी जनता कर्फ्यूचा पहिला टप्पा संपला. त्यानंतर लागलीच सोमवारी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्याने, या कर्फ्यूबाबत अनेकांमध्ये संभ्रम दिसून आला. तर राजकीय कुरघोडीतून या कर्फ्यूला विरोध करण्यात आल्याचे किरकोळ प्रकारही सोमवारी दिसून आले. त्याचवेळी शहरातील काही व्यापाऱ्यांनी या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शहरातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या रूग्ण संख्येत गत आठवड्यापासून झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, स्थानिक पातळीवर जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला. या कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.मात्र, त्यानंतर सोमवार १३ जुलै ते बुधवार १५ जुलैपर्यंत पुन्हा या कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. तर राजकीय कुरघोडीतून या कर्फ्यूला विरोध झाल्याचे दिसून आले. मात्र, कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत अनेक व्यावसायिकांनी संयम ठेवत, जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खामगाव आणि परिसरात अनलॉक कालावधीत शिथिलता होती. या कालावधीत अकोला येथून अनेकांची ये-जा असल्यामुळे खामगाव शहरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, गत आठवड्यापासून खामगाव शहरात कोरोना झपाट्याने वाढीस लागला आहे. शहरातील अनेक वस्तींमधे कोरोनाचा विळखा असल्याचे चित्र आहे.
भाजीपाल्याची काही दुकाने सुरूखामगावात शनिवार ते रविवार तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यावेळी तीनही दिवस नागरिकांनी जनता कर्फ्यूचे कडक पालन केले. त्यानंतर पुन्हा रविवार ते मंगळवार जनता कर्फ्यू तीन दिवस वाढविण्यात आला. यादरम्यान मात्र शहरातील काही भागात भाजीपाल्याची दुकाने सुरू होती.