लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कालखेड रोडवर दुधाचे चारचाकी वाहन व दुचाकीची अमोरासमोर धडक झाल्ल्याने ५ वर्षीय मुलाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक तुरीच्या शेतात पळून गेला. घटनास्थळाजवळ उपस्थित असलेल्या कालखेडच्या दोन युवकांनी जखमींना सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. पातुर्डा येथील दुधाची वाहतूक करणारे वाहन (एमएच २८ एबी ५१९३) शेगाववरून पातुर्ड्याला परत जात असताना कालखेडरोडवरील बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळ विरूध्द दिशेने येत असलेल्या एका दुचाकीला धडकले. या अपघातात दुचाकीवर बसलेला ५ वर्षीय अभिजीत युवराज खोंड जागीच ठार झाला. दरम्यान, दुचाकीचालक युवराज भिकाजी खोंड(३७,रा.कुंदेगाव ता. संग्रामपूर) हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित असलेले कालखेड येथील विजय हेलोडे व सुरज सरदार यांनी वेळीच जखमींना एका वाहनात टाकून सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. मात्र तोपर्यंत अभिजीतची प्राणज्योत मालविली होती. तर युवराज खोंड यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्च्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दुधाची वाहतूक करणारे वाहन पातुर्डा येथील एकाचे असलल्याचे समजते. या पप्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायय्यक पोलिस उपनिरीक्षक श्याम पवार, मंगेश सोळंके, अजय शिरसोले यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. दरम्यान, सध्या शेगाव परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
जीप- दुचाकीची धडक; पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 5:08 PM