शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
2
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
3
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
4
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
5
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
6
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
7
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
8
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
9
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
10
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
11
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
12
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
14
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
15
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
16
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
17
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
19
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
20
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट

बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील विद्यार्थी आंदोलनाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:01 AM

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गाजत असलेल्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांची अखेर चौकशी सुरू झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवार, २0 डिसेंबर रोजी प्रत्यक्षपणे तपासाला सुरुवात केली.

ठळक मुद्देसंस्थेचे सचिव खाडे यांनी बुधवारी केली महाविद्यालयाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गाजत असलेल्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांची अखेर चौकशी सुरू झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवार, २0 डिसेंबर रोजी प्रत्यक्षपणे तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी प्राचार्य डी. एम. अंभोरे यांच्यावर अनेक आरोप केले. या सर्व आरोपांची शहानिशा आता ही समिती करीत आहे.बुलडाण्यातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांच्या कारभाराच्या विरोधात; तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या अपमानजनक वागणुकीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडलेले आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याची बाब श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यापयर्ंत पोचली. तसेच जिजामाता महाविद्यालयातील काही  प्राध्यापकांनीही एक संयुक्तरीत्या लेखी तक्रार संस्थाचालकांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे, कार्यकारिणी सदस्य ठुसे यांनी बुधवारी महाविद्यालयात येऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी  प्राचार्य अंभोरे यांच्यावर काही आरोप केले आहेत. यावर चौकशी समितीचे प्रमुख खाडे यांनी विद्यार्थ्यांना आश्‍वस्त केले की, प्राचार्य अंभोरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील. फक्त विद्यार्थ्यांनी आपले सर्व लेर्स नियमितपणे करावे व आपले शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, असे स्पष्ट केले.या चौकशी समितीच्या सदस्यांनी संपूर्ण कॉलेज परिसराची बुधवारी पाहणी केली. प्रयोगशाळा, वाचनालयाचे निरीक्षण केले. याठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा नसल्याचे दिसून आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे प्रमुख खाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ज्या काही तक्रारी मांडल्या आहेत, त्यामध्ये तथ्यांश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा