शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:13 IST

Jijamata Cooperative Sugar Factory for sold सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विदर्भातील पहिल्या व तोट्यात गेलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला असून, २००२ पासून अवसायकांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची देणी ही ७९ कोटींच्या घरात गेली आहेत.  हा कारखाना पुन्हा कार्यान्वित व्हावा, यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र हा कारखाना प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकला नव्हता. हा कारखाना स्थापन होऊन आज ४९ वर्षे झाली आहेत. १२०० मेट्रीक टन गाळपक्षमता असलेल्या या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९७२-७३ मध्ये झाला होता. मात्र अनेक कारणांनी हा कारखाना डबघाईस आला होता. त्यामुळे सरफेशी ॲक्टअंतर्गत या कारखान्याची सध्याची मालमत्ता, यंत्रसामग्री व जवळपास ७१ हेक्टर जमिनीसह ७९ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी विक्रीस काढण्यात आली. राज्य व केंद्र सरकारची देणी हा कारखाना फेडू शकलेला नाही.१४ मार्च २००२ रोजी हा कारखाना अवसायनात काढण्यात आला होता. सध्या विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव आणि सिंदखेड राजाचे सहनिबंधक (सहकारी संस्था) आर. एल. हिवाळे हे सध्या या कारखान्याचे अवसायक म्हणून काम पाहात आहेत. केंद्र, राज्य व कामगारांची मिळून जवळपास २४ कोटी रुपयांपेक्षाही अधिक देणी देणे बाकी आहे.आता हा कारखाना विक्रीस काढला असल्यामुळे नेमका तो कोण घेतो की, प्रत्यक्षात तो कार्यान्वित होऊ शकतो का? हा मूळ प्रश्न आहे. यापूर्वी हा कारखाना भाडेतत्त्वावर काहींना चालवायलाही दिला गेला होता. मात्र नंतर पुन्हा तो बंद पडला होता. आता राज्य सहकारी बँकेने पुन्हा हा कारखाना विक्री करण्यासाठी काढला आहे. येथील यंत्रसामुग्रीहीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा कारखाना कोण घेणार याकडे लक्ष लागून आहे.महिन्याभरात कामगारांची मिळणार देणीकारखान्याने बनविलेल्या ५२ हजार क्विंटल साखरेपैकी १४ हजार ५०० क्विंटल साखरेच्या विक्रीतून मिळालेल्या ३ कोटी ३६ लाख रुपयातून सर्वेच्च न्यायालयाच्या  आदेशानुसार ८३६ कामगारांची देणी ‘प्रथम हक्क’ तत्त्वानुसार देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या कारखान्याचे अवसायक प्रयत्नशील आहेत. राज्य सहकारी बँकेने या साखर विक्रीतून प्राप्त झालेली ३ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम (व्याजासह) अवसायकांच्या खात्यात जमा केली आहे. ‘प्रो-डाटा बेसीस’ तत्त्वानुसार ही देणी कामगारांना येत्या काळात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  अवसायकांकडून सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये दिलेल्या आदेशानुसार आता ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी त्यांच्या थकित वेतनासाठी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच चार ते पाच दिवस रांत्रदिवस ठिय्या दिला होता. त्यानंतर या हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाbuldhanaबुलडाणा