आता हा कारखाना विक्रीस काढला असल्यामुळे नेमका तो कोण घेतो की, प्रत्यक्षात तो कार्यान्वित होऊ शकतो का? हा मूळ प्रश्न आहे. यापूर्वी हा कारखाना भाडेतत्त्वावर काहींना चालवायलाही दिला गेला होता.
-- महिन्याभरात कामगारांची देणी मिळणार -
कारखान्याने बनविलेल्या ५२ हजार क्विंटल साखरेपैकी १४ हजार ५०० क्विंटल साखरेच्या विक्रीतून मिळालेल्या ३ कोटी ३६ लाख रुपयातून सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ८३६ कामगारांची देणी ‘प्रथम हक्क’ तत्त्वानुसार देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या कारखान्याचे अवसायक प्रयत्नशील आहेत. राज्य सहकारी बँकेने या साखर विक्रीतून प्राप्त झालेली ३ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम (व्याजासह) अवसायकांच्या खात्यात जमा केली आहे. ‘प्रो-डाटा बेसीस’ तत्त्वानुसार ही देणी कामगारांना येत्या काळात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवसायकांकडून सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये दिलेल्या आदेशानुसार आता ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी त्यांच्या थकित वेतनासाठी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच चार ते पाच दिवस रांत्रदिवस ठिय्या दिला होता. त्यानंतर या हालचाली सुरू झाल्या आहेत.