शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

जॉबकार्ड, आधार जोडणीत जिल्हा अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:20 AM

थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देमनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांच्या फसवणुकीस बसेल आळा!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.दोन वर्षांपूर्वी मनरेगावरील मजुरी न मिळाल्याने तथा फसवणूक झाल्याने बुलडाणा  जिल्ह्यातील लोणार तालुका पाच मजुरांच्या आत्महत्यांमुळे राज्यात चर्चेत आला  होता. त्यामुळे लोणार तालुक्यात ओडीसा आणि ठाणे येथील संस्थांनी केंद्राच्या  निर्देशानंतर येऊन थेट सामाजिक अंकेक्षणही करीत तब्बल १७ हजार मजुरांचे  अर्जही भरून घेतले होते. या कटू अनुभवातून बाहेर पडत आजच्या तारखेत  बुलडाणा जिल्हा राज्यात जॉब कार्ड, आधार कार्ड थेट मजुरांच्या बँक खात्यांशी  लिंक करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ९९.७४ टक्के मजुरांचे आधार  कार्ड आणि जॉब कार्ड लिंक होऊन बँक खात्याशी जोडले गेले आहेत.मनरेगांतर्गत बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ४८८ मजुरांनी नोंदणी  केलेली आहे. यापैकी एक लाख २१ हजार ८४७ मजुरांचे आधार कार्डची पड ताळणी झाली आहे. एक लाख दोन हजार ९१३ मजुरांच्या आधारकार्ड, जॉबकार्ड  आणि बँक खात्याचे लिंकिंग झालेले आहे.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मजुरांच्या थेट खात्यात त्यांची मजुरी जमा होत  आहे. वर्तमान स्थितीत मनरेगांतर्गत २0१ रुपये मजुरी दिली जाते. तिन्ही बाबींची  लिंकींग झाल्यामुळे थेट मजुराच्या खात्यात त्याची मजुरी पडत असल्याने त्याची  फसवणूक होण्याचा धोका  टाळण्यास मदत मिळत आहे.

पुढारलेले जिल्हे मागेमजुरांचे जॉबकार्ड, आधार आणि बँक खाते लिंक करण्याच्या बाबतीत राज्यातील  पुढारलेले जिल्हे मागे आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा याबाबत सध्या  दुसर्‍या तर नागपूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. अकोला जिल्हा हा चौथ्या  क्रमांकावर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि बुलडाणा  जिल्ह्यालगतचा जालना जिल्हा तळाकडून अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे  आणि पाचवे आहेत.

मजुरांचे स्थलांतर समस्याबुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने लोणार या मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या  तालुक्यातून मोठय़ा प्रमाणावर औरंगाबाद, सुरत, मुंबई, ठाणे या भागात स्थलांतर  पूर्वी होत होते. जादा मजुरी औद्योगिक क्षेत्रात मिळत, म्हणून येथील मजूर प्रामुख्याने  त्या भागात जातात;परंतु अलिकडील काळात त्यात आता कमी आली आहे.  सामाजिक अंकेक्षण आणि काम ‘दो फॉर्म’ भरल्यानंतर या स्थितीत बर्‍यापैकी  फरक पडल्याचे चित्र आहे.