बुलडाणा : शेतकऱ्यांनी आपल्या शेतांची पुर्व मशागत करून खरीप पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात बँकांना पात्र शेतकºयांना उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पुर्ण करण्यासाठी येत्या १५ जूनची डेडलाईन दिली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पिक कर्ज वितरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे आदेश दिले. याप्रसंगी आमदार सर्वश्री संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि. प. मुख्य कायर्कारी अधिकारी षण्मुगराजन आदींची उपस्थिती होती. महात्मा जोतिराव फुले कजर्माफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकºयांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करण्याचे स्पष्ट करीत कजर्माफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकºयांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकºयांनाही कर्ज वाटप करण्याचे याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकºयांना बँकांनी पीक कर्ज वितरण करावे. पिक कर्ज वितरण करताना कोविड आजाराच्या पाश्वर्भूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रूमाल तोंडावर असणे, सॅनीटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुका स्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घेणे, पीक कर्ज कागदपत्रे आदीबाबत कार्यवाही करावी. शेतकºयांना सहज होईल, अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा याप्रंसगी घेण्यात आला. जिल्ह्यात ३० मे पर्यंत २२ हजार ६१० खातेदार शेतकºयांना १७३.०३ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले.(प्रतिनिधी)
पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टासाठी १५ जूनची ‘डेडलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:49 AM