लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : स्थानिक शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला. द्वितीय जयहिंद क्रीडा मंडळ दहीगाव जिल्हा नगर, तृतीय कपील चोपडे क्रीडा मंडळ पातुर्डा जि.बुलडाणा व चौथे बक्षीस जय बजरंग कबड्डी संघ गोभणी तालुका रिसोड जिल्हा वाशिम या संघाने मिळविले आहेत.जय संतोषी माता कबड्डी संघ जानेफळ यांच्या सदर कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते म. प्र.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच गजानन वडणकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाल्यानंतर कबड्डीच्या सामन्याला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये एकूण ६५ कबड्डी संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कबड्डी संघासह मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्या तूनसुद्धा कबड्डी संघ याठिकाणी आले होते. भारतीय कबड्डी संघातील मनोजकुमार बाली, आंतरराष्ट्रीय कबड्डी या खेळाडू विनायक माळी, प्रो कबड्डीमधील खेळाडू अनिल निंबाळकर, मयूर शिवतलकर, तुषार भोईर, प्रोकबड्डी पंच जितेश शिरवाळकर यांची उपस्थिती होती.आयोजकांतर्फे ठेवण्यात आलेले ७१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रथम यशाचे मानकरी जय बजरंग कबड्डी संघ, कापूसवाडी ता.सोयगाव जि.औरंगाबाद या संघास ५१ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस जय हिंद क्रीडा मंडळ दहीगावने जि.नगर ३१ नगर रुपयांचे तृतीय बक्षीस कपील चोपडे क्रीडा मंडळ पातुर्डा जिल्हा बुलडाणा २१ हजार रुपयांचे चौथे बक्षीस जय बजरंग कबड्डी संघ गोभणी जिल्हा वाशिम यांना दिले. सदर बक्षिसांचे वाटप पं.स.सदस्य गजानन वडणकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश पाखरे, प्रोकबड्डी पंच जितेश शिरवळकर, अशोक मुरडकर, रामदास सवडतकर इत्यादींच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी रामेश्वर मुरडकर अमोल गवई, अमोल राजपूत, विजय कृपाळ, प्रदीप कृपाळ, शे.चांद, राजू ठाकरे, नीलेश महाजन इत्यादींनी परिo्रम घेतले.
जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:13 AM
शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला.
ठळक मुद्देद्वितीय - नगर जिल्हय़ातील दहीगाव येथील जयहिंद क्रीडा मंडळ तृतीय - बुलडाणा जिल्हय़ातील पातुर्डा येथील कपील चोपडे क्रीडा मंडळ