लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव नगर पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक सोमवारी अविरोध झाली. या निवडणुकीत भाजप आणि भाजप समर्थित नगरसेवकांच्या गळ्यात विविध सभापती पदाची माळ गळ्यात पडली. विषय समिती निवडणुकीनंतर संख्या बळानुसार भाजपच्या २, तर काँगे्रसच्या एका सदस्याची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली.नगर पालिका विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सोमवारी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण होते. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी कामकाज पाहिले. यावेळी नगराध्यक्षा अनिता डवरे उपस्थित होत्या. सभेला सुरूवात झाल्यानंतर भाजपच्या संख्याबळानुसार ७ तर काँग्रेसचे ४ असे एकुण ११ सदस्य विविध विषय समित्यांवर निर्देशित करण्यात आले. विविध विषय समित्यातील सदस्यांनी नेत्याची निवड केली. त्यानंतर विषय समिती सभापती पदासाठी नामांकन दाखल करण्यात आले. नामांकन दाखल करण्यासाठी दोन तासाचा अवधी देण्यात आला. त्यानंतर नियोजीत दोन तासानंतर पालिकेच्या सभागृहात विषय समिती सभापतींची निवडणूक पार पडली. यामध्ये विरोधी पक्षाने सभापतीपदासाठी एकही अर्ज दाखल केला नाही. परिणामी सोमवारी आयोजित विषय समिती सभापती निवडणूक अविरोध पार पडली. पालिकेच्या आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणी पुरवठा आणि महिला व बालकल्याण समिती सदस्य संख्या ११ असून संख्याबळानुसार भाजपचे ७ तर विरोधी पक्षाचे ४ नगरसेवक या समितीमध्ये गेले. नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक सतीषआप्पा दुडे, नगरसेविका शोभाताई रोहणकार यांची भाजपकडून तर काँग्रेसतर्फे नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल ल लतीफ यांची नियुक्ती झाली. असे आहेत नवीन सभापतीबांधकाम सभापती : रत्नमाला पिंपळेपाणी पुरवठा सभापती : शहरबानो जहीरूल्लाशाहशिक्षण सभापती : गणेश सोनोनेआरोग्य सभापती : राजेंद्र धनोकारमहिला व बालकल्याण सभापती : रेखा जाधवउपसभापती : जकीयाबानो शे.अनिससोमवारी पहाटे झाला निर्णय !भारतीय जनता पक्षामध्ये सभापतीपदासाठी चांगलीच रस्सीखेच दिसून आली. रविवारी रात्री उशीरापर्यंत सभापतींच्या नावावर एकमत न झाल्याने सोमवारी पहाटे पहाटे विविध विषय समिती सभापतींच्या निवडीवर आ.आकाश फुंडकर यांच्या संमतीने वर्णी लावण्यात आली. विषय समिती सभापती निवडीत स्थान न मिळाल्याने भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये नाराजीही दिसून आली.यांची अनुपस्थिती होतीया निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सिमा वानखडे, काँग्रेस माजी गटनेत्या अर्चना ताले, स्विकृत नगरसेवक संदीप वर्मा, नगरसेवक प्रविण कदम, राकाँचे नगरसेवक देवेंद्र देशमुख अनुपस्थित होते. काँग्रेसच्या गटनेतेपदी अमेय सानंदाकाँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांचे पती तथा कृउबासचे माजी सभापती संतोष टाले यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अर्चना टाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. परिणामी त्यांच्या जागी गटनेते म्हणून काँग्रेसचे युवा नगरसेवक अमेय सानंदा यांची काँग्रेसकडून नियुक्ती करण्यात आल्याचे तसेच यासंबंधातील सर्व सोपस्कर पार पाडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. काँग्रेस गटनेता निवडीवर उपाध्यक्ष संजय पुरवार, ओमप्रकाश शर्मा यांनी आक्षेप नोंदविला.
खामगाव नगरपालिकेची विषय समिती निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 3:48 PM