बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ह्यसांसद आदर्श ग्रामह्ण योजनें तर्गत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी करमोडा गाव निवडले आहे. येणार्या वर्षात खासदार आदर्श ग्राम म्हणून या गावात संपूर्ण सुविधा निर्माण करण्याचा संकल्प खा.जाधव यांनी व्यक्त केला. यासंदर्भात लोकमतशी बोलताना खा.जाधव म्हणाले की, बुलडाणा जिल्हा मु ख्यालयापासून १३0 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव लोहगाव, शिवणी, दयालनगर व करमोडा अशा चार गावांमिळून एका ग्रामपंचायत अंतर्गत येते. ३ हजार ९0 एवढी लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये विविध नागरी सुविधा उ पलब्ध करुन देण्यावर भर राहणार आहे. ग्रामपंचायत भवन, शाळा इमारती, आरोग्य उपकेंद्र, जोडरस्ता, रस्ते, पाणी, नाल्या सफाई व संपूर्ण शौचालय निर्मिती याला प्राधान्य दिले जाणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी या गावाची निवड करुन जिल्हाधिकार्यांना तशी सूचना देण्यात आली आहे.
करमोडा होणार आदर्श ग्राम
By admin | Published: November 14, 2014 12:08 AM