कारेगाव येथे शुक्रवारी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १५० नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये ३७ नागरिक कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण गावच 'कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनासदृश लक्षणे नागरिकांना दिसत असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या लक्षात आल्याने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये, कोविड केअर व्यवस्थापक डी. भास्कर मापारी यांच्या मार्गदर्शनात येथे कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी डॉ. प्रियंका कुकडे, सुमन पवार, आरोग्यसेवक वाघ यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गावातील गर्दीची ठिकाणे, मंदिरे, दुकाने, पाणवठा यावर गर्दी होऊ नये, तसेच सुरक्षित अंतर राखून नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार सैपन नदाफ यांनी केले आहे.
कारेगावला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:33 AM