ध्येय ठेवून एकाच परिक्षेवर लक्ष केंद्रीत करा - नारायण टेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 7:13 PM
योगेश फरपट खामगाव : सोशल मिडीया हे स्पर्धा परिक्षेसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. पण नेमके काय वाचायचे व पहायचे ...
योगेश फरपटखामगाव: सोशल मिडीया हे स्पर्धा परिक्षेसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. पण नेमके काय वाचायचे व पहायचे आहे हे समजले पाहिजे. केवळ स्वप्न असून चालत नाहीतर ते पुर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीची गरज असते. एकच ध्येय ठेवून एकाच परिक्षेवर लक्ष केंद्रीय करा, तेव्हाच हमखास यशस्वी होता येवू शकते, असा मानस महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पदासाठी डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत राज्यात इतर मागासवर्गीय परिक्षेत द्वितीय आलेले नारायण टेरे यांनी व्यक्त केला. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद..शिक्षण डि.एड. झाले असतांना एम.पी.एस.सी.कडे कसे वळलात ? शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे होते. म्हणून डि.एड. अभ्यासक्रम पुर्ण केला. मात्र २०१० मध्ये सिईटी ही परिक्षा झाली. त्यानंतर ९ वर्षानंतर म्हणजे २०१९ मध्येच परिक्षा घेण्यात आली. यादरम्यान परिक्षा झालीच नाही. त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. आपली कौटूंबिक पार्श्वभूमी कशी आहे ? शेतकरी कुटूंबातील आहे. वडीलांचे छत्र हरवले आहे. त्यामुळे आईनेच धीर दिला. काकांनीच सांभाळ केला. गावातून कुणी अधिकारी झाले नाही. अशा वातावरणातून आल्याने गरिबीची जाणिव आहे. आई शेतीकरून घर चालवते. अशा परिस्थितीत कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा कामधंदा करावाच लागेल, ही गरज होती. त्यामुळे शेतीतही कुटूंबाला शेतीत हातभार लावत होता. स्पर्धा परिक्षेची तयारी कशी केली ? पैसे देवून नोकरी मिळणे, माझ्यासाठी कठीण होतेच. त्यामुळे एम.पी.एस.सी. हा चांगला पर्याय उपलब्ध आहे, असे मानले. त्यादृष्टीने मिळेल ते पुस्तक गोळा करून अभ्यासास सुरुवात केली. गावात अभ्यास होवू शकत नव्हता म्हणून अमरावती येथील आयएएस प्री. ट्रेनिंग सेंटरला प्रवेश मिळवला. त्याठिकाणी १ वर्ष रात्रंदिवस अभ्यास केला. त्याठिकाणी खºया अर्थाने दिशा मिळाली. कोणत्याही परिक्षेसाठी अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका महत्वाच्या ठरतात. मी यांनाच गुरु मानले. प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र २१ पेजेसच्या नोट्स काढल्या. साधारणपणे १० ते १२ तास अभ्यास केला. आपण किती वेळ अभ्यास केला. यापेक्षा किती मन लावून केला याला अधिक महत्व आहे. एमपीएससीसाठी कोणत्या पुस्तकांचा लाभ होतो ? ेस्टेट बोर्ड, एनसीईआरटी च्या पहिली ते दहावीपर्यंतच्या पुस्तकांचा वापर करावा. सोबतच दररोज एक दैनिकाचे बारीक वाचन करावे. याशिवाय जिल्हयातील, राज्यातील, देशातील घडामोडीवर लक्ष असू द्यावे. जेणेकरून जनरल नॉलेजचे प्रश्न आपण सहजतेने सोडवू शकतो. ‘लोकमत’चा मी नियमित वाचक असून ‘लोकमत’चा सुद्धा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे.सोशल मिडियाचा परिक्षेसाठी कसा वापर केला ? सकारात्मक विचार कायम मनात राहावे यासाठी युट्यूबवर विविध आयएएस, आयपीएस अधिकाºयांच्या मुलाखती, प्रेरणादायी व्हिडिओ पाहत होतो. यापासून सकारात्मक उर्जा मिळत होती. त्यामुळे नकारात्मक विचारांना कधीच थारा मिळाला नाही. आज बहुतांश विद्यार्थ्यांकडे अँन्ड्राईड मोबाईल आहे. स्पर्धा परिक्षेचे नानाविध अॅप्स उपलब्ध आहेत. यामाध्यमातून मार्गदर्शन मिळू शकते.