राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक उत्तरदायित्व निभावत धृति फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने सिदंखेडराजा तालुक्यात कोरोना जनजागृती करून व मोफत सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
तालुक्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, धार्मिक ठिकाणे, महिला बचत गट, बँका, दवाखाने यांना मोफत सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
फाउंडेशनच्या वतीने किनगावराजा, पिंपळगाव कुडा, लिंगा, देवखेड, राहेरी बु, सोयंदेव या गावांमध्ये महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय, क्लासेस, दवाखाने व कार्यालयांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर फाउंडेशनच्या माध्यमातून नियमित मास्क वापरणे, वेळोवळी हात स्वच्छ धुणे, शासन स्तरावरून देण्यात येणाऱ्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालण करणे, जनजागृती करण्यात आली.
यावेळी धृति फाउंडेशनचे सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर गोपाल देवकर, धृति फाउंडेशनचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष समाधान देशमुख, सिंदखेडराजा तालुका उपाध्यक्ष इसाक कुरेशी, पत्रकार अफरोज पठाण, शेख इरफान, रेवती आढाव, ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मन देशमुख, श्रीराम सरकटे, शरद जाधव, शिवराज शेळके, योगेश कास्तोडे, विनोद आढाव, प्रवीण मोगल, प्रमोद देशमुख, सिद्धेश्वर सोळुंके, कल्याण मोगल, सज्जन शेळके, सतीश कायंदे, भारत सरकटे, एकनाथ सरकटे, अमोल आढाव आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयाेजन
धृति फाउंडेशन व गावकरी मंडळी देवखेड यांच्या संयुक्त विद्यमाने देवखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन २ मे रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.