शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

खामगाव बाजार समितीत मालाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 3:02 PM

बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

खामगाव : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण जिल्ह्यात अत्यल्प असले तरी दोन दिवसांपुर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी पीक व्यवस्थापनावर भर देत असून, शेतात फवारणी, डवरणीच्या कामांना वेग आला आहे. यामुळेच बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.बुलडाणा जिल्ह्यात आजवर वार्षिक सरसरीच्या ३५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात असला तरी शेतकरी पावसाबाबत आशावादी आहेत. पाऊस पुरेसा पडून पीक उत्पादन समाधानकारक होईल, या आशेने शेतकरी शेतात राबतच आहेत. जिल्ह्यात पंधरवाड्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे सुकत असलेल्या पिकांना आधार झाला. या पावसानंतर पिके तरली आहेत. आता दोन दिवसांच्या उघाडीनंतर शेती कामांना वेग देण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शेतीत डवरणी, फवारणी आणि खत देण्यासह निंदणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरी ठेवलेला शेतमाल विकणे थांबविले आहे. त्याचा परिणाम बाजार समित्यांमधील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. खामगाव बाजार समितीत बुधवारी तूर, सोयाबीन आणि हरभरा मिळून केवळ ५६० क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. मलकापूर बाजार समितीत भुईमुंग, उडीद, तूर, गहू, हरभरा आणि सोयाबीन मिळून ७५० क्विंटल शेतमालाची आवक झाली होती.सर्वच ठिकाणच्या बाजार समितीत प्रत्येकी एक ते दीड क्विंटलपेक्षा कमीच शेतमालाची आवक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आता शेतकºयांकडे गतवर्षीच्या हंगामातील फारसा शेतमाल शिल्लकही राहिला नाही. शेतमालाच्या भावात घसरणशेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक घटली असताना शेतमालाचे दरही सतत घसरत आहेत. तुरीला ५८०० रूपये प्रति क्विंटल असे समाधानकारक दर मिळत असले तरी गेले चार महिने तेजीत असलेल्या सोयाबीनसह हरभरा, भुईमुंग, मुग या शेतमालाच्या दरात मोठी घसरण होत आहे. सोयाबीनचे दर कमाल ३५०० रूपये प्रति क्विंटल, हरभºयाचे ४२०० रूपये प्रतिक्वंटल होते. हीच स्थिती इतरही शेतमालाच्या दराची असल्याचे बुधवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान दिसून आले.

टॅग्स :khamgaonखामगावMarket Yardमार्केट यार्ड