- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या गोदामावरील इलेक्ट्रानिक्स काट्यात दोष निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा केल्याची कबुली ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.ने दिली. त्यामुळे भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाने संबंधितांना सदर प्रकरणी( प्रकरण कम्पाऊंड केले) दंड आकारला आहे. या दंडाच्या रक्कमेचा भरणा संबधितांना ई-चालान पध्दतीने भरण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणी कुठेतरी पाणी मुरल्यानेच संबंधितांवर सौम्य प्रकारची कारवाई झाल्याची खमंग चर्चा आहे.भारतीय खाद्य निगमने खामगाव येथे करारबध्द केलेल्या ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा. लि. व्यवस्थापनाने वे-ब्रिजवरील इलेक्ट्रॉनिक्स काट्याचे इंडिकेटर वैद्यमापन शास्त्र विभागाला माहिती न देता बदलविल्याचे धक्कादायक प्रकरण २९ एप्रिल २०२० रोजी उघडकीस आले. याप्रकरणी भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाचे निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी २९ एप्रिल रोजी एफसीआयच्या गोदामावरील इलेक्ट्रानिक्स काटा जप्त केला. त्यानंतर भारतीय वैद्य मापन शास्त्र विभागाने संचालक सागर नंदकुमार भाटेवरा, रा. नागपूर, ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि. टेंभूर्णा फाटा यांच्या विरोधात भारतीय वैद्यमापन शास्त्र विभाग कायदा २००९ आणि नियम २०११ अन्यवे कलम ८ (३), नियम १८(३) आणि कलम २५, नियम २३ अन्वये कारवाई करण्यात आली. काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हाची कबुली दिली. वैद्यमापन शास्त्र विभागाने लावलेला दंड भरण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे हे प्रकरण कम्पाऊंड करण्यात आले.गोदामावरील काट्याचे प्रमाणीकरण!टेंभूर्णा ता. खामगाव येथील गोदामावर काट्यावर दोष निर्माण केल्यानंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांनी २८००० रुपये दंडाचा भरणा केल्यानंतर शुक्रवारी दुपारी येथे भारतीय वैद्यमापन शास्त्र निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी आपल्या पथकासह काट्याचे प्रमाणीकरण केले. वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाचे सहा. नियंत्रक एन.आर. कांबळे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
कोट...काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.कडून दंडाचा भरणा करण्यात आला आहे. त्यानंतर गोदामावरील काट्याचे इंडिकेटर बदलल्यानंतर नव्याने प्रमाणीकरण करण्यात आले आहे.- प्रदीप शेरकारनिरिक्षक,भारतीय वैद्यमापन शास्त्र,खामगाव विभाग.
फोटो:---