शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

खामगाव : घाटाखाली काँग्रेस-भारिपची सरशी; भाजपला धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:36 AM

खामगाव : घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि शेगाव या चार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी निवडणूक झाल्यानंतर लगेचच बुधवारी मतमोजणी पार पडली.   यामध्ये खामगाव तालुक्यात- 0४, मलकापूर-0१, जळगाव जामोद-0३, शेगाव-0२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१0 ग्राम पंचायतींचे निवडणूक निकाल घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि शेगाव या चार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी निवडणूक झाल्यानंतर लगेचच बुधवारी मतमोजणी पार पडली.   यामध्ये खामगाव तालुक्यात- 0४, मलकापूर-0१, जळगाव जामोद-0३, शेगाव-0२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.खामगाव : तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. खामगाव मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीत मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, उपरोक्त चारही ग्रामपंचायतीवर काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघाने दावा ठोकला आहे. खामगाव तालुक्यातील अटाळी, घारोड, जयपूर लांडे आणि रोहणा येथे  निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये जयपूर लांडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी जुलालसिंग मानसिंग पवार  विजयी झाले आहेत. तर सदस्यपदी संदीप कल्याणसिंह पवार, सुवर्णा अनिल पवार, गजानन पुंडलिक लांडे, संध्या दिनेश तायडे,  सुनिता पंजाब टाकरस, सदानंद शेषराव तायडे, शुभम भानुदास लांडे, हर्षा महेंद्र तायडे अविरोध विजयी झाले आहेत.  घारोडच्या सरपंचपदी शहनाज परवीन मो.रईस विजयी झाल्या असून, या ठिकाणी सुलोचना संतोष वर्‍हाडे, सुनीता संजय धोत्रे, मो. रियाज मो. याकुब अविरोध तर भिकाजी पांडुरंग इंगोले,  धम्मपाल मोतीराम इंगोले, गणेश समाधान वाकेकर, प्रमिला आनंदा इंगोले, नंदाबाई भास्कर इंगोले, सीमा उमेश पाचपोर विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे रोहणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास नामदेव सावंग तर सदस्यपदी मोहन नामदेव खंडारे, मीना किशोर सावंग, सत्यभामा ज्ञानदेव कोंडे, गजानन जगदेव तायडे,  पूनम प्रल्हाद घाटे (अविरोध),  सुरेश रायभान सावंग, संगीता एकनाथ रोठे, अर्चना मनोजराव टाले तर अटाळी ग्रामपंचायत सरपंचपदी दिलीप ओंकार काटोले, तर सदस्यपदी रामेश्‍वर तुकाराम पातोंड,  दुर्गा कैलास गवई (अविरोध), प्रीती विठ्ठल दांदळे, कैलास गाडीवान पवार, निर्मला मारोती कदम, अनिल सहदेव महाले,  हर्षा संदीप डिक्कर,  वंदना मोहन मुर्‍हे,  राजेंद्र तुकाराम गवई, श्रीराम सीताराम बेंडे, नुसरत परवीन शेख विजयी झाले आहेत. चारही ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस-भारिप-बमंसने वर्चस्व स्थापन केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला अनपेक्षितरीत्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला असल्याचे दिसून येते.

देवधाबा सरपंचपदी मालतीबाई बोरसे देवधाबा : मलकापूर तालुक्यातील एकमेव देवधाबा ग्रा.पं.निवडणुकीचा निकाल २७ डिसेंबरला सकाळी १0 वाजता प्रशासकीय इमारत मलकापूर येथे झालेल्या मतमोजणीनंतर घोषित करण्यात आला.  सरपंच पदाकरिता मालती ज्ञानदेव बोरसे  यांनी १0९३ मते मिळविली असून, ४0५ मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. तर सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणुकीमध्ये वार्ड नं.१ मधून विश्‍वनाथ मधुकर वसतकार २२७, संगीता श्रीकृष्ण लांडगे २९८, देवकाबाई मोतीराम सहावे २९५ मते घेऊन विजयी झाल्या तर वार्ड नं.२ मधून आत्माराम प्रल्हाद बोरसे ३५४, सविता ईश्‍वर बोरसे ३0२ मते घेऊन विजयी झाल्या. तर वार्ड नं.३ मधून ज्ञानेश्‍वर प्रकाश उगले ३४0, शकुंतला एकनाथ सपकाळ ३८६, निर्मलाबाई शिवाजी राहणे ४0३ मते घेऊन विजयी झाल्या. वार्ड नं.४ मधून कैलास तुळशीराम कावळकर ३३३, फुलसिंग जुलालसिंग सोळंके ३६१, तर निर्मलाबाई बंडू गुरचळ ३६६ मते घेऊन विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र तायडे यांनी यावेळी केली. या निवडणुकीमध्ये एकता ग्रामविकास पॅनल यांनी सरपंच पदासह ११ उमेदवार मैदानात उतरविले असता त्यांना ५ सदस्य पदावर विजय मिळाला आहे. तर बहुजन विकास आघाडीच्या पॅनलने सरपंच पदासह ११ जागा लढविल्या असता त्यांच्यासह ५ जण सदस्य पदावर विजयी झाले आहेत, तर देवधाबा ग्रामविकास आघाडीने सरपंच व २ सदस्य पदाकरिता  उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले असता, त्यांनी सरपंच पदावर बाजी मारली असून, सोबत एक सदस्य ही निवडून आले आहेत. तर सरपंच पदाकरिता उमेदवार असलेल्या सविता चंद्रकांत कवळे यांना ५९३, वैशाली संदीप मंडवाले यांना ६८८ मते मिळाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या सर्मथकांनी जल्लोष करुन गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.

शेगाव तालुक्यात भारिप-बमसंचा झेंडा. शेगाव : महिनाभराच्या कालावधीपासून शेगाव तालुक्यातील टाकळी धारव व कालखेडमध्ये ग्रामपंचायतीचा रणसंग्राम सुरु होता. या निवडणुकीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होऊन २७ डिसेंबरला दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. टाकळी धारवच्या सरपंचपदी सिद्धार्थ दादाराव गवई सर्वसाधारण आरक्षणातून तर कालखेडच्या सरपंचपदी सरस्वतीबाई अमृता खंडारे अनुसूचित जाती स्त्री या राखीव आरक्षणातून निवडून आल्या आहेत. टाकळी धारव येथील प्रल्हाद मारोती डाबेराव (अनुसूचित जमाती), श्‍वेता दिलीप गवई (अनुसूचित जाती स्त्री), पुनाजी अर्जुन गवई (अनुसूचित जाती), शुभांगी नीळकंठ ढगे (नामाप्र स्त्री), ज्ञानेश्‍वर शालीग्राम चावरे (नामाप्र), हे पाच उमेदवार ग्रामपंचायत  सदस्यपदी अविरोध निवडून आले असून रेखा रामदास चव्हाण (सर्वसाधारण स्त्री), मंगला देवेंद्र बाठे (सर्वसाधारण स्त्री) हे दोन सदस्य निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून आले आहेत.      कालखेडमध्ये धूपदाबाई नामदेव इंगळे (अनुसूचित जाती), सरस्वतीबाई अमूता खंडेराव (अनुसूचित जाती स्त्री), ललीता सुनील सरदार (अनुसूचित जाती स्त्री), तेजराव ज्ञानदेव भटकर (सर्वसाधारण) हे चार उमेदवार ग्रामपंचायत सदस्यपदी अविरोध निवडून आले असून, पवन शांताराम कळंबे (नामाप्र), वैशाली संदीप गुरव (नामाप्र स्त्री), मंदाबाई वसंता वाकोडे (सर्वसाधारण) या आरक्षणातून हे तीन सदस्य निवडून आले आहेत.

कालखेडात चार तर टाकळीत पाच सदस्य अविरोध..टाकळी धारवमध्ये झालेल्या सात ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेतून पाच जागांवर सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर कालखेडमध्ये सात ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांपैकी चार जागा अविरोध झाल्या आहेत.दोन्ही ग्रामपंचायतीवर भारिप-बमसंचा झेंडा फडकल्याचा दावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक