खामगाव : घाटाखाली काँग्रेसचे ‘पकोडे पकाओ’आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:12 AM2018-02-15T01:12:19+5:302018-02-15T01:14:15+5:30

खामगाव : सुशिक्षीत तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. परंतू सध्या देशामध्ये करोडो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. आई-बाबा म्हणतात शिका आणि सरकार म्हणते पकोडे विका हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा आहे असा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला. 

Khamgaon: Congress's 'Pokode Pakaio' movement under the deficit! | खामगाव : घाटाखाली काँग्रेसचे ‘पकोडे पकाओ’आंदोलन!

खामगाव : घाटाखाली काँग्रेसचे ‘पकोडे पकाओ’आंदोलन!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशिक्षित बेरोजगार युवकांची सरकारवर टीका 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सुशिक्षीत तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. परंतू सध्या देशामध्ये करोडो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. आई-बाबा म्हणतात शिका आणि सरकार म्हणते पकोडे विका हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा आहे असा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला. 
खामगावातील एकबोटे चौकात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपयर्ंत पकोडे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सानंदा यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली. मोदींनी आम्ही सत्तेत आल्यानंतर दरवर्षी २ कोटी सुशिक्षीत बेरोजगारांना काम देवू, असे सांगुन सुशिक्षीत बेरोजगारांचा विश्‍वासघात केला आहे. सुशिक्षीत युवकांनी  संघटीत होउन विश्‍वासघातकी मोदी सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, कृउबास सभापती संतोष टाले, महिला तालुकाध्यक्षा सौ.भारती पाटील, न.प.कॉंग्रेस पक्षनेत्या सौ.अर्चनाताई टाले, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीमोदद्ीन, तालुकाध्यक्ष बबलु पठान, युवक कॉंग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल, नगरसेवक राणा अमेयकुमार सानंदा, युवक कॉंग्रेसचे  अध्यक्ष दामोदर वडोदे, शहर कॉंग्रेस कमिटीचे सचिव अशोक मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात शेकडो सुशिक्षीत बेरोजगार तरुण-तरुणी, कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जळगांव जामोद : युवक काँग्रेस ने केले पकोडे वाटप आंदोलन
आज १४/२/२0१८ रोजी युवक काँग्रेस जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्थानिक तहसिल कार्यालयासमोर पकोडे वाटप आंदोलन करण्यात आले।भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका टीव्ही शो च्या मुलाखती दरम्यान भारतातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांसबधी बेताल वक्त्यव्य करून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तडन्याचे कामे करावी व स्वयंरोजगार निर्मिती करावी।असे बेताल वक्तव्य करून भारतभरातिल बेरोजगार युवकांचा अपमान केला।वास्तविक पाहता सत्तेत येण्यापूर्वी भाजपा पक्षाने रोजगार निर्मिती मोठया प्रमाणावर केल्या जाईल अशी खोटी व भुरळ पडणारी आश्‍वासने दिली।वास्तविक शासनाला चार वर्षे पूर्ण होऊन देखील रोजगार निर्मिती शून्य आहे तसेच देशाचा जीडीपी दर ही दिवसेंदिवस घसरत आहे।तरी सुद्धा मोदी उर्मटपणे अशी वक्तव्य करून युवकांचा अपमान करीत आहेत. त्याचा याठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष पराग पाटील, नितीन ढगे,अमर पाचपोर,नंदू बाठे, डॉ. प्रशांत राजपूत, सैय्यद हुसेन राही, महिला काँग्रेसच्या ज्योतीताई ढोकणे, प्रकाश पाटील, ता.अध्यक्ष राजु पाटील, युनूस खान, नगरसेवक अर्जुन घोलप, संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, मोदसिर काजी, प्रवीण भोपळे, सचिन हरमकार, अरुण दीघडे, मयूर राऊत, राहुल ढोले, पंकज घुते, केतन विभानी, विश्‍वास पाटील,मोहन बोडखे, जावेद खान, अँड. राजपूत, आशिष वायझोडे,माणिक खोद्रे, दिनेश काकडे, गणेश मोरे, विलास मानकर ,शकिर खान व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते 

Web Title: Khamgaon: Congress's 'Pokode Pakaio' movement under the deficit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.