लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीसाठी शहरात आलेली वधू नियोजित वराला रस्त्यात सोडून मावस भावासोबत दुचाकीने रफुचक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारातून हा संबंध झाला होता. खान्देशातील युवकाच्या फसवणुकीचा हा प्रकार शहरातील चांदमारी भागात घडला.याबाबत बापू सुकलाल पाटील (वय ३0) रा. भातखेड ता. एरंडोल ह.मु. लोणी ता. पारोळा जि.जळगाव खान्देश याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला एजंट नितीन भगवान साळुंके (रा. बुलडाणा) याने २३ डिसेंबर रोजी शेगाव येथे दोन मुली दाखविल्या. त्यापैकी अर्पिता डोंगरे (रा. अकोला) ही मुलगी पसंत आली. पाहणीचा कार्यक्रम आटोपला त्याच दिवशी नितीन साळुंके याचा त्यांना फोन आला व त्याने अर्पिता ही तिच्या काकाकडे राहते. तिच्या लग्नासाठी त्यांना ७0 हजार व लग्न कार्याचा खर्च म्हणून ३0 हजार द्यावे लागतील, असे सांगितले. यावेळी बापु याने ८५ हजार रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर लगेच त्याने २६ डिसेंबर ही लग्नाची तारीख ठरविली. ठरल्याप्रमाणे बापू त्याचे जावई, दोन बहिणी, आई, वडील हे लग्नासाठी खामगावला आले. त्यांच्या परिचयाच्या चांदमारी भागातील देवीदास प्रल्हाद इंगळे यांच्या घरी २६ डिसेंबर रोजी सकाळी साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपला. यानंतर कोर्ट मॅरेज संबंधीचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात आले. यानंतर वधू अर्पिताचा मावसभाऊ तेथे आला व तो सोने घेण्यासाठी वधू-वरांना घेऊन दुचाकीने बाजारात गेला. तेथे बतावणी करून बापूला टिळक पुतळ्य़ाजवळ उतरवून अर्पितासह त्याने पलायन केले. या प्रकरणात पोलिसांनी नितीन साळुंके आणि वधू अर्पिता, तिचा मावसभाऊ, तिची मोठी बहिणीसह एका विरोधात गुन्हा दाखल केला.
खामगाव : बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूने केले पलायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:15 AM
खामगाव : लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीसाठी शहरात आलेली वधू नियोजित वराला रस्त्यात सोडून मावस भावासोबत दुचाकीने रफुचक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारातून हा संबंध झाला होता. खान्देशातील युवकाच्या फसवणुकीचा हा प्रकार शहरातील चांदमारी भागात घडला.
ठळक मुद्देखान्देशातील वराची खामगावात फसवणूक