लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगावएसटी आगारात पुरेशा संख्येत बसेस नसल्यामुळे लांब पल्याच्या गाड्यांसोबतच ग्रामीण भागातील अनेक शेड्युल्ड वेळेवर रद्द करण्यात येतात. परिणामी, सेवेतील अनेक गाडयाच रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.खामगाव एसटी आगारात एकुण ६५ बसेसची संख्या आहे, यामध्ये ५९ गाड्या वापरात आहेत. तर काही गाड्या नादुरुस्त झालेल्या आहेत. वापरात नसलेल्या काही गाड्या आगारातील आवारातच कायमस्वरुपी धक्क्यावर लावण्यात आलेले आहेत. याबाबत चौकशी केली असता नादुरुस्त झालेल्या बसेस दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले स्पेअरपार्टच वरिष्ठ कार्यालयातून देणे बंद करण्यात आले, असल्याची माहिती मिळाली. ज्या बसेस नादुरुस्त आहेत व त्या आगारातच थांबून आहेत, त्या बसेसचेच जुने स्पेअर-पार्ट काढून इतर बसेससाठी वापरावेत असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे समजते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा प्रवाशी वगार्तून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खामगाव आगाराच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही. (प्रतिनिधी)खिडक्या आणि काचा नसलेल्या बसेसचा वापर!खिडक्या आणि खिडक्यांना आवश्यक असलेल्या काचा, बसमध्ये आवश्यक असलेली बाकडीही पुरेशा संख्येने नसल्यामुळे तब्बल ०६ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी नियमित रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, धावत असलेल्या काही बसेस या बसेस वरिष्ठ अधिकाºयांच्या दबावामुळे रस्त्यावर धावत असल्याचा सुत्रांचा दावा आहे.अनेक बसमध्ये धुळीचे प्रमाण अधिकसध्या शेगाव- खामगाव रस्त्याचे काम सुरु असून खिडक्याच नसलेल्या बसेस प्रवाशी वाहतूक करीत असल्यामुळे प्रवाशी धुळीने माखून जात आहेत. तीच परिस्थिती खामगाव- आंबेटाकळी आणि खामगाव-चिखली रस्त्याची आहे. मात्र, याकडे एसटी महामंडळाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण भागातील फेºया अनियमित!खामगाव आगारातील अपुºया बसेसमुळे खामगाव- लाखनवाडा, खामगाव- पिंपळगाव राजा- ढोरपगाव, खामगाव- शेगाव, खामगाव- जलंब-माटरगाव या ठिकाणचे अनेक शेड्युल्ड वेळेवर रद्द करण्यात येतात. ही बाब नित्याचीच झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
खामगाव आगारात अपुऱ्या बसेस; प्रवाशांची गैरसोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 3:38 PM