शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

खामगाव : पूजा उद्योगाच्या ‘गोवर्‍या’ तेजीत; ऑनलाइन बुकिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:21 AM

खामगाव: हॉटेल  व्यवसायात गोवर्‍यांचा वापर वाढला असतानाच, गोवर्‍यांना पूजा उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मोठय़ा शहरांमध्ये गोवर्‍यांची ऑनलाइन बुकिंगही होत आहे. परिणामी, रानातील गोवर्‍यांही आता भाव खात असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देग्रामीण महिलांना मिळाला रोजगार!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: हॉटेल  व्यवसायात गोवर्‍यांचा वापर वाढला असतानाच, गोवर्‍यांना पूजा उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मोठय़ा शहरांमध्ये गोवर्‍यांची ऑनलाइन बुकिंगही होत आहे. परिणामी, रानातील गोवर्‍यांही आता भाव खात असल्याचे दिसून येते.जनावरांच्या शेणाचे महत्त्व ग्रामीण भागात अबाधित असले तरी, शहरी भागात वाळलेल्या गोवर्‍यांची मागणी वाढली आहे. हॉटेलमध्ये जेवण रुचकर करण्यासाठी चुलीवरील विविध पदार्थांसोबतच रान गोवर्‍यांमधील रोडग्यांचे चलन वाढले आहे. ग्रामीण परिसरातील तसेच जंगलातून वेचून आणलेल्या गोवर्‍यांची शहरात विक्री केली जाते; मात्र दिवसभर राबराब राबल्यानंतर वेचलेल्या गोवर्‍यांच्या पोतडीला अपेक्षित भाव मिळत नाही; परंतु शेतात काम करून मिळालेल्या मजुरीपेक्षा स्वतंत्रपणे गोवर्‍या वेचून मिळणारा रोजगार अधिक असल्याचे गोवरी विक्रेत्या शेवंताबाई कर्‍हाडे यांनी सांगितले.

ऑनलाइन विक्री! ऑनलाइन पद्धतीने काही नामांकित वेबसाइटवर शेणाच्या गोवर्‍यांचा व्यापार होत आहे. परिणामी, गोवर्‍यांचे भाव वधारले आहेत. यामध्ये हाताने थापलेल्या गोवर्‍यांपेक्षा रानातील गोवर्‍यांना अधिक मागणी आहे. शहरी भागातील तुटवडा लक्षात घेता, ग्रामीण भागातूनच शेणाच्या गोवर्‍यांचा पुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागातून खरेदी केलेल्या गोवर्‍या मोठय़ा शहरांमध्ये आणि मोठय़ा शहरांमधून या गोवर्‍यांची ऑनलाइन विक्री केली जात आहे.

होम-हवनातही उपयोग! गायीच्या शेणाच्या गोवरीचा होम-हवन आणि धार्मिक विधीसाठी उपयोग केला जातो. रथसप्तमीला या गोवर्‍यांचे विशेष महत्त्व असते. परिणामी, धार्मिक उत्सव काळात तसेच रथसप्तमीला गायीच्या शेणाच्या गोवर्‍यांची विक्री वाढते. त्याचप्रमाणे वीटभट्टीच्या उद्योगातही गोवर्‍यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे दिवाळीनंतर गोवर्‍यांच्या व्यवसायाला तेजी येते. शेतातील गोवर्‍यांसोबतच हाताने थापलेल्या गोवर्‍यांचीही आता विक्री वाढत आहे.

हॉटेल व्यवसायातही वापर!हॉटेलच्या गुणवैशिष्ट्यात वाढ करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये नावीन्यपूर्ण मेनूमध्ये चुलीवरच्या खाद्यपदार्थांचा वापर वाढला आहे. यामध्ये रान गोवर्‍यांमध्ये भाजलेले  रोडगे हॉटेलचा आता विशेष मेनू बनले आहेत. त्यामुळे हॉटेल संचालकांकडून शेणाच्या गोवर्‍यांना वाढती मागणी आहे. रान गोवर्‍या या ग्रामीण भागातच उपलब्ध होतात. परिणामी, या गोवर्‍यांमुळे ग्रामीण भागातील महिला आणि नागरिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.

ग्राहकांचा बदलता ‘ट्रेन्ड’ पाहता हॉटेलच्या जेवणाचेही स्वरूप बदलत चालले आहे. रान गोवर्‍यांमध्ये भाजलेल्या रोडग्यांना मोठी मागणी आहे. व्यक्तिगत ग्राहकांसोबतच महाप्रसादातही या मेनूचा वापर होत असल्याने, आम्ही ग्रामीण भागातून रान गोवर्‍या खरेदी करतो. ४0-५0 रुपयांना एक लहान (सिमेंटची) पोतडी मिळते.- विनोद खराटे, हॉटेल व्यावसायिक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव