खामगाव: खामगाव तालुक्यात काही भागात रविवारी दुपारी झालेल्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात गारा सुद्धा पडल्या. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील काही भागात अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडवून दिली. बहुतांश शिवारातील गव्हाचे पिक आडवे झाले आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी चार सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. तासभर कमी- अधिक प्रमाणात हा पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता. वादळी वाºयामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे पीक फडातच आडवे झाले आहे.बारीक होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील अंत्रज, आंबेटाकळी, बोरी अडगाव, बोथाकाजी, शहापूर, कंचनपुर,अटाळी उमरा,आवार पेडका,विहिगाव, आसा, दुधा आदी भागांत हा अवकाळी पाऊस झाला. गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या पिकाचेच मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना अद्याप शासकीय पातळीवरून पुर्णत: मदत मिळाली नाही. खरिप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासकिय पातळीनंतर मदतीची घोषणा झाली. परंतु, शेतकरी त्यातुन आजूनही सावरला नाही. सोयाबीन, कापूस, उडिद, मूग या नगदी पिकांचे नुकसान झाले. खरीप पिकाने धोका दिल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. अनेक भागातील शेतकºयांनी हरभरा, गहू, कांदा, मका,या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. हुडहुडी भरणाºया वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याची मागणी होत आहे.
खामगाव : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:27 PM